Uncategorized

सनी आठवलेंना कुमावतांचा दणका, बीडमधील जुगार अड्ड्यावर धाड, आठवलेसह 24 जुगाऱ्याना पकडले, 21 लाखाचा मुद्देमाल जप्त


काल दिनांक 09/02/2023 रोजी रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की बीड माळीवेस येथे इसम नामे सनी आठवले हा विना परवाना बेकायदेशीर रित्या आपली स्वतःचे फायदा करता आपले राहते घरासमोरील पत्राचे शेडमध्ये काही इसमाना एकत्र बसवुन् जन्ना मना नावाच्या जुगारावर पैसे लावून हार जितचा झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ खेळतो आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्या वरुन सदरची माहिती मा पोलिसअधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांना कळून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब व त्यांचे पथकातील पोलिस् अधिकारी व अमलदार यच्या सह सदर माहितीचे ठिकाणी जाऊन दिनांक 09/03/2023 रोजी 1030 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणारे लोक पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले त्यावेळी रेड पार्टीतील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून क्लब मालक सनी शामराव आठवले यांचे सह एकूण 24 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी जुगरचे साहित्य मोबाईल व मोटरसायकल असा एकूण 2135970 मुदेमाला जप्त करून 24 आरोपी विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक वैभव अनिल सारंग पोलीस ठाणे केज यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही मा.पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग राजेश पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर राजू वंजारे बालाजी दराडे सचिन अहकारे मपोहेका रुक्मिणी पाचपिडे आशा चौरे पोलीस नाईक विकास चोपणे अनिल मंदे दिलीप गीते महादेव भैरवाल रामहरी भंडाने सच संजय तुले दीपक जावळे शफिक पाशा चालक सहाय्यक फौजदार शेषराव यादव युवराज भूबे यांनी केलेली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!