कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी भर, आरोग्य प्रशासनाची दमछाक
बीड, दि.10 (लोकाशा न्युज) ः जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. रविवारी दिवसभर करण्यात आलेल्या अँटीजन टेस्ट मधून 137 तर रात्री आलेल्या अहवालानुसार 233 असे चोविस तासात जिल्ह्यात तब्बल 370 जण पॉझिटिव्ह आले आहेत. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांची व्यवस्था करतांना आरोग्य प्रशासनाची चांगली दमछाक झाल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळाले. रविवारी मध्यरात्री 3855 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 3622 जणांचे निगेटिव्ह तर 233 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड तालुक्यातील 163, अंबाजोगाई-10, आष्टी-6, धारूर-2, गेवराई-10, केज-7, माजलगांव-7, परळी-22, पाटोदा-2, शिरूर-3, वडवणी-1 अशा रूग्णांचा समावेश आहे.