Uncategorized

सलग दुसर्‍या आठवड्यातही बिंदुसरेच्या स्वच्छतेसाठी कलेक्टर, सीओ उतरले नदीपात्रात,नगर पालिकेचा फौजफाटा सोबत घेवून राबविली स्वच्छता मोहीम

बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : बीड शहरातून वाहणार्‍या बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली  सलग दुसर्‍या आठवड्यात शनिवारी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी नगर पालिकेच्या सीओ निता अंधारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणा सोबत घेवून जेसीबी, पोकलेन व ट्रॅक्टर्सच्या साह्याने शहरातील जुनी वेस दगडी पुल परिसर पलीकडे बाजूचा नदीचा भागात बिंदुसरा नदीचे पात्र आणि पुलाजवळ  ठिकठिकाणी साचलेला कचरा काढण्यासाठी मोहिम राबविण्यात आली.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने हे देखील उपस्थित होते. शहरातून वाहणार्‍या बिंदुसरा नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांच्या सूचनेनुसार बीड नगर परिषदेच्या यंत्रणेमार्फत मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी बीड शहरातील बिंदुसरा नदी स्वच्छतेचे मोहीम हाती घेतली आहे. काल जुनी वेसकडून दगडी पुल परिसर पलीकडे कंकालेश्वर मंदिराकडे जाणारा पुलाच्या रस्त्याच्या बाजूचा नदीचा भागा जवळील बिंदुसरा नदीचे पात्र  स्वच्छ करण्यात आले. पुलाखाली साचलेला कचरा, जेसीबीच्या साह्याने उचलण्यात आला. यावेळी दगडी पुलालगतचे पात्र स्वच्छ होईपर्यंत मोहिम सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बिंदुसरा स्वच्छतेची संकल्पना त्यांच्या मनामध्ये होती. सदर काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुख्याधिकारी श्रीमती अंधारे यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करीत नगर परिषदेच्या यंत्रणेला  कार्यान्वित केले. मागच्या शनिवारी सदर मोहीम सुरुवात करण्यात आली, या कामाला शहरातील सोमेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली आहे. खूप मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ आणि प्लास्टीक  उचलून पात्र स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर काल पुन्हा शहरातील जुनी वेस कडून दगडी पुल परिसर पलीकडे कंकालेश्वर मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूचा नदीच्या भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!