Uncategorized

ग्रामीण भागातील शिक्षण आजही उत्तमच, पंकजाताई मुंडे यांनी जि. प. शाळेतील आठवणी केल्या ताज्या,डी.पी आव्हाड माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे थाटात उदघाटन

सिन्नर (नाशिक) ।दिनांक ०९।
ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा आजही उत्तमच आहे. खेडयात शिकलेली अनेक माणसे आज मोठमोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचली आहेत. मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले. इथल्या शिक्षणाचा फायदा मला भविष्यात झाला आणि आजही होतो आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचे महत्व आज येथे अधोरेखित केले.

पास्ते (ता. सिन्नर) येथील
व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित डी. पी. आव्हाड माध्यमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उदघाटन आज पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठया थाटात पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी पोलिस अधिकारी डी पी आव्हाड, हेमंत धात्रक, तानाजी जायभाये, सरपंच स्नेहलता आव्हाड, उदय सांगळे, दिगंबर गीते आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांशी संवाद साधतांना पंकजाताई पुढे म्हणाल्या की, लोकनेते मुंडे साहेबांवर या भागातील लोकांनी अतोनात प्रेम केले आहे. राजकारणात काम करत असताना जातीभेद बाजूला सारून सर्व सामान्य माणसांसाठी काम करायचे हे त्यांचे स्वप्न मला आपल्यापर्यंत घेऊन आले आहे. लोकांचं निष्पाप, निस्सीम प्रेम हिच माझी शक्ती आणि सर्वात मोठं वैभव आहे. तुमच्या प्रेमापोटीच आज मी इथपर्यंत आले आहे.

ग्रामीण भागातील शिक्षण आजही चांगले आहे. मी मुंडे साहेबांची मुलगी असले तरी माझंही शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं आहे. माझ्या वर्गात समाजाच्या सर्व घटकांतील मुलं मुली होती. मुंडे साहेबांनी मला मुद्दाम या शाळेत पाठवले, लहानपणापासून त्यांनी आम्हाला शिस्त लावली. जि.प. शाळेत शिकल्यामुळे पुढे ग्रामविकास मंत्री झाल्यावर मला याचा फायदा झाला. ग्रामीण भागासाठी चांगलं काम करता आलं. अनेक ठिकाणी शाळा खोल्या, अंगणवाडीसाठी निधी देता आला असं पंकजाताई म्हणाल्या.

शिस्त, समर्पण नव्या पिढीत यावं

इंटरनेट मुळे आज जग खूप जवळ आलयं. याचा जेवढा फायदा तेवढंच नुकसान देखील आहे. नव्या बदलाचा चांगला वापर करता आला पाहिजे. प्राथमिक शिक्षणापासूनच संस्कार, शिस्त आणि समर्पणाची भावना नव्या पिढीमध्ये यावी असं वातावरण तयार झालं पाहिजे अशी अपेक्षा पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!