परळी वैजनाथ । दिनांक१२।
राज्यात आता आपली सत्ता आली आहे. २०१४ ते १९ मध्ये जशी चांगली कामे झाली तसे दिवस परत येतील, मतदारसंघाला पुन्हा सोन्यासारखे दिवस आणायचे आहेत. हा मतदारसंघ बिकाऊ नाही तर टिकाऊ आहे हे सिध्द करायचं आहे. सकारात्मक भावनेनं काम करा, मी सदैव तुमच्या पाठिशी आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला आधार दिला. मागील तीन वर्षांत काय मिळालं याचा आता तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे असंही त्या म्हणाल्या.
पंकजाताई मुंडे यांनी आज सिरसाळा व परिसरातील तपोवन, पौळ पिंप्री, मोहा, गाढे पिंपळगाव, कौडगाव साबळा गावांचा जनसंपर्क दौरा केला, त्यावेळी त्या बोलत होत्या. ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचं वाजत-गाजत जंगी स्वागत केलं. तपोवन येथे महादेवाचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याची सुरवात केली.
ग्रामस्थांशी संवाद साधताना पंकजाताई म्हणाल्या, तुमचं माझं प्रेमाचं नातं आहे. मी आज आपल्याशी फक्त संवाद साधायला आले. कुठलाही विषय नाही की राजकारण नाही सहज भेटायला आले. दोन वेळा तुम्ही मला संधी दिली. त्याचं मी सोनं केलं. प्रत्येक गावात विकासासाठी भरभरून निधी दिला, न मागता दिलं. अनेकांना याची आजही आठवण येते. विरोधक असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुध्दा हे खासगीत मान्य करतात. कुणाकडून कधी कशाची अपेक्षा केली नाही पण मागील तीन वर्षांत काय मिळालं याचा विचार करा. कुठला निधी नाही, अनुदान नाही की विमा नाही. राजकारणाचं पार बाजारीकरण झालयं. मतदारसंघ खूप चांगला आहे, त्यामुळे चांगल्या माणसाला ताकद दिली पाहिजे.
सकारात्मक भावनेनं काम करा
परळीत माझा नाही विकासाचा पराभव झाला ही भावना सामान्यांची झालीयं, २०१९ चा निकाल लागला असता तर आज चित्र वेगळ दिसल असतं. आता
सगळं सकारात्मकतेनं हाताळा. नकारात्मक भावनेनं काम करू नका. मी तुमच्या सदैव पाठिशी आहे. लोकनेते मुंडे साहेबांनी आपल्यावर खूप प्रेम केलं. मलाही तुमचं प्रेम मिळालं. असंच प्रेम कायम राहू द्या असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या. पंकजाताईंना या दौऱ्यात ज्येष्ठांचेही आशीर्वाद मिळाले. सर्व ठिकाणी ग्रामस्थांशी त्यांनी हितगुज साधलं.
या दौऱ्यात भाजपचे तालुकाध्यक्ष
सतीश मुंडे, श्रीहरी मुंडे, उत्तम माने, सुधाकर पौळ, संतोष सोळंके, वृक्षराज निर्मळ, रमेश कराड, नितीन ढाकणे, बाबासाहेब काळे, मुन्ना काळे, कपील चोपडे, गोविंद कादे रोहित देशमुख, मोहन आचार्य, विक्रम मिसाळ, झुल्फू पट्टेदार, सुरेश माने, प्रभाकर कदम, नवनाथ देशमुख, प्रभाकर
••••