सिरसाळा न्यूज : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्या अब्रुचे लचके तोडणा-या मुंगी (ता.धारुर) येथील नराधम प्रमोद सोमनाथ सलगर याच्या सिरसाळा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पिडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस स्टेशन येथे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी सविस्तर पिडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वृत्त असे कि,
त्यांची मुलगी वय अंदाजे १३ वर्ष पाच महीने ही दि. २२ ऑक्टोबर रोजी २०.०० वाजता दरम्यान आजी आजोबा कडे राहत्या घरुन निघुन गेली होती. प्रमोद सोमनाथ सलगर राहणार मुंगी हा पळवुन घेवुन गेल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादमध्ये नमुद केले होते. त्यांचे फिर्यादवरून गुरनं २०५ / २०२२ कलम ३६३ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयातील पिडीत ही आज रोजी मिळुन आली आहे. तिने आपले जबाबात सांगीतले की, प्रमोद सोमनाथ सलगर राहणार मुंगी यांचे व माझ्या मध्ये वेळोवेळी शारीरीक संबंध झाले आहे. सदर जबाबावरुन नमुद गुन्हयात ३७६ (२) (एन), ३७६ (२) (जे), १२० (ब) भादंवि सह कलम ४,६,१७ बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा (पोस्को) २०१२ सह कलम ९,१० बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम वाढ करण्यात आले आहे. नमुद गुन्हयातील आरोपींना अटक करण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत चालु होती. सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक पुंडगे मॅडम अति प्रभार पिंक मोबाईल पथक उपविभाग माजलगाव ह्या करीत करीत आहे.
● पोस्को कायद्यात सुधारणा
: २०१८ साली भारतातील कथुआ आणि उन्नाव येथे बालिकांवर बलात्कार झाल्याच्या घटनांनंतर गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने पोक्सो कायद्यात बदल करण्यात आले. त्यानुसार आता बारा वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येईल. १६ वर्षांवरील मुलींवर बलात्कार केल्यास कमीत कमी १० वर्षे ते २० वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.