सिरसाळा न्यूज : गेल्या अनेक महिन्यांपासून पुढारी/कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नोव्हेंबर ते जानेवारी ह्या तीन महिण्या दरम्यान तीन टप्प्यांत घेतल्या जाण्याची शक्यता आहे. ह्या दृष्टिने निवडणूक आयोगाच्या हालचाली वेगाने सुरू असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिकांच्या मुदती संपुन जवळपास १ वर्षे होत आहे. ह्या संस्थाचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे. निवडणूकीला आस लावून बसलेले व इच्छूक उमेदवार/पक्ष ताटकळल्या सारख्या अवस्था झाली आहे.निवडणूक कधी लागणार याची प्रतिक्षेत आहेत. परंतु आता हि प्रतिक्षा संपणार आहे. नोव्हेंबर ते जानेवार दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुका तीन टप्प्यांत होणार असल्याची शक्यता आहे.
● गट/ गण पुर्वी प्रमाणेच राहिले तर आरक्षण बदलणार
: महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती गट/गणाची रचना बदलली होती. पंरतु सत्तेवर आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करुन सन २०१७ च्या प्रमाणेच गट गण रचना ठेवण्याचा निर्णय केला होता. नवीन रचने नुसार आरक्षण घोषीत झाले होते. पंरतु पुर्वी प्रमाणेच गट राहिले तर आरक्षण मात्र बदलणार यात काही शंका नाही.