Uncategorized

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल, पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडत व्यक्त केला विश्वास

परळी वैजनाथ ।दिनांक १७।
परतीच्या पावसाचा फटका बसल्याने राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांची अक्षरशः माती झाली आहे, यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक बनली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करत शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. अशा संकटात या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकार निश्चित करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था परतीच्या पावसाने व अतिवृष्टीने व्यथित करणारी झाली आहे असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार निश्चित उभे राहील असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून १२ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीची एक प्रकारे भेटच दिली आहे त्याबद्दलही त्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत समाधानाची भावना ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!