Uncategorized

लोकाशाचे उपसंपादक अभिजित नखाते यांना कै. राधाकिसन परदेशी पत्रकारिता पुरस्कार जाहिर, उद्या पुरस्काराचे होणार वितरण तर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दत्ता बारगजेंचाही पुरस्काराने होणार सन्मान


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी लक्षात घेवून दै. लोकाशाचे उपसंपादक अभिजित नखाते यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल तर इन्फटचे दत्ता बारगजे यांना सामाजिक कार्याबद्दल कै. राधाकिसन परदेशी पुरस्कार जाहिर झाला असून त्याचे उद्या वितरण केले जाणार आहे. या बद्दल नखाते आणि बारगजे यांचे संपूर्ण जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.
श्रीगुरूदत्त संगीत विद्यालय संत नामदेव नगर बीड यांच्या वतीने दरवर्षी कै. राधाकिसन परदेशी पुरस्कार दिला जातो, या वर्षी तो दै. लोकाशाचे उपसंपादक अभिजित चंद्रकांत नखाते यांना व सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार इन्फट इंडियाचे दत्ता बारगजे यांना जाहिर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या दि. 17 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दै. दिव्य मराठीचे चीफ ब्युरो दिनेश लिंबेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी, पुण्यनगरीचे उपसंपादक अविनाश वाघिरकर, दै. लोकमतचे उपसंपादक संजय तिपाले, द ग्रेट मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत वराट यांच्या उपस्थित दिला जाणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीकिसन परदेशी व दत्तात्रय परदेशी यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!