बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : बालक हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी गुरूवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली. जिल्ह्यातील बालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात यावेळी पोलिस अधीक्षकांसोबत सविस्तर चर्चा केली. बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जे काही प्रश्न असतील ते नक्कीच मार्गी लावू , असा विश्वास यावेळी पोलिस अधीक्षकांनी बोलून दाखविला आहे.
बालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाल हक्क संरक्षण आयोग धडाडीने काम करत आहे. कामातील कृर्तत्वपणा लक्षात घेवूनच अॅड प्रज्ञा खोसरे यांच्यावरही या आयोगाच्या सदस्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ही जबाबदारी आपल्याकडे येताच खोसरे यांनीही सक्षमपणे काम सुरू केलेले आहे. गुरूवारी बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड शेंगर, सदस्या प्रज्ञा खोसरे हे दोघे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते, सायंकाळी त्यांच्यासह बालकल्याण समिती अध्यक्ष अशोक तांगडे, संतोष वारे, सुरेश राजहंस, छाया गडगे, परीक्षा अधिकारी निर्माण, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी श्री तडवी यांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली, यावेळी जिल्ह्यातील बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली. त्यावर जिल्ह्यातील बालकांचे सरंक्षणाच्या दृष्टीने जे काही प्रश्न असतील ते नक्कीच सोडविले जातील, असा विश्वास यावेळी पोलिस अधीक्षकांनी बोलून दाखविला. दरम्यान आयोगाला पोलिस अधीक्षकांनी दिलेला हाच विश्वास जिल्ह्यातील बालकांना खर्या अर्थाने धीर देणारा ठरणार आहे.