परळी वैजनाथ। दि. ३०।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर जाऊन रेणुकामातेचे दर्शन घेतले. संस्थानच्या वतीनं यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं.
पंकजाताई मुंडे यांनी सकाळी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून गोपीनाथ गडावरील देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्या श्रीक्षेत्र माहूरकडे रवाना झाल्या. सायंकाळी त्यांनी माहूरगडावरील श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचं हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं. तत्पूर्वी माहूर शहरात आगमन होताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. माहूरहून नागपूरकडे जाताना पांढरकवडा येथील देवीचेही त्यांनी दर्शन घेतले. दरम्यान माहूरकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.
••••