Uncategorized

ट्रक चोरी करून भंगारात विकणाऱ्या टोळीला अंबाजोगाई पोलीसांनी पकडले, एएसपी कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

अंबाजोगाई प्रतिनिधीअलीकडच्या काळात वाहन चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून चोरीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असल्याने वाहनधारकात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्यात परळी आंबेजोगाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऊसतोड कामगाराच्या तीन चार ट्रक चोरीच्या घटना घडल्या असून याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल आहे चोराच्या टोळीने रस्त्यावर उभा असलेला ट्रक चोरून नेऊन भंगारच्या दुकानात विकला आहे या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर डी वाय एस पी सुनील जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेषराव उदारयांच्या पथकाने अधिकचा तपास करीत ट्रक चोरणाऱ्या टोळीला बीड लातूर जिल्ह्यातून सुमारे पाच जणाला अटक केली आहे पकडण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली व आरोपीने ट्रक चोरी करून त्यातील दोन ट्रक हे स्क्रॅप करून विकल्याची कबुली दिली आहे असून ट्रक चोरी प्रकरणात मोठे रॉकेट व धन दांडगे आरोपी असण्याची दाट शक्यता साकुर चे फिर्यादी ट्रक मालक शेख रहमान अली यांनी व्यक्त केला आहे अंबाजोगाई तालुक्यातील ट्रक चोरी प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात यश प्राप्त झाले आहे त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे व या प्रकरणात अजून किती आरोपीआहेत व या चोरी प्रकरणात धन दांडग्या आरोपीचा समावेश आहे का यानुसार पुढील तपास चालू आहे लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळतील असा आत्मविश्वास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शेषराव उदार यांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितला आहे

असल्याने वाहनधारकात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्यात परळी आंबेजोगाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऊसतोड कामगाराच्या तीन चार ट्रक चोरीच्या घटना घडल्या असून याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल आहे चोराच्या टोळीने रस्त्यावर उभा असलेला ट्रक चोरून नेऊन भंगारच्या दुकानात विकला आहे या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर डी वाय एस पी सुनील जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेषराव उदारयांच्या पथकाने अधिकचा तपास करीत ट्रक चोरणाऱ्या टोळीला बीड लातूर जिल्ह्यातून सुमारे पाच जणाला अटक केली आहे पकडण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली व आरोपीने ट्रक चोरी करून त्यातील दोन ट्रक हे स्क्रॅप करून विकल्याची कबुली दिली आहे असून ट्रक चोरी प्रकरणात मोठे रॉकेट व धन दांडगे आरोपी असण्याची दाट शक्यता साकुर चे फिर्यादी ट्रक मालक शेख रहमान अली यांनी व्यक्त केला आहे
अंबाजोगाई तालुक्यातील ट्रक चोरी प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात यश प्राप्त झाले आहे त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे व या प्रकरणात अजून किती आरोपीआहेत व या चोरी प्रकरणात धन दांडग्या आरोपीचा समावेश आहे का यानुसार पुढील तपास चालू आहे लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळतील असा आत्मविश्वास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शेषराव उदार यांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितला आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!