परळी ।दिनांक २६।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील प्रसिद्ध अशा काळरात्री मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्या अगोदर सकाळी गोपीनाथ गडावरील देवीच्या मंदिरात त्यांच्या हस्ते विधीवत पूजेने घटस्थापना करण्यात आली. राज्यातील सर्व सामान्य जनता, शेतकरी यांच्या सुख-समृध्दीसाठी त्यांनी देवीकडे प्रार्थना केली.
शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून सर्वत्र मोठया उत्साहात सुरवात झाली. परळीतही ठिक ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सकाळी गोपीनाथ गडावर असलेल्या देवीच्या मंदिरात विधीवत पूजा करून घटस्थापना केली. माहूरची रेणुकामाता, कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजापूरची भवानी आई अशा तीनही देवींच्या सुंदर व सुबक मुर्त्या याठिकाणी मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या आहेत. घटस्थापनेनंतर दुपारी शहरातील प्रसिद्ध असलेल्या काळरात्री देवीच्या मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिर परिसराची पाहणी केली. रविवारी त्यांनी याच मंदिरात स्वच्छता अभियान राबवले होते. वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
••••