बीड, Yono SBI च्या नावाखाली पॅन कार्ड अपडेट करण्याचे कारण सांगुन झालेली ऑनलाईन पध्दतीने फसवणुक केलेली रक्कम 3,00000 / – रु . सायबर पोलीस स्टेशन , बीड यांनी तपास करुन फिर्यादीला परत मिळवून दिली .
दिनांक 25/08/2022 रोजी सायबर पोलीस स्टेशन , बीड येथे श्री अनिल कोळेकर रा . पुरुषोत्तमपुरी ता . माजलगाव जि . बीड , मोबाईल क्रमांक 9923775904 यांनी तक्रार दिली की , त्यांचे माजलगाव येथे SBI चे खाते असुन त्यांच्या मोबाईलवर your SBI YONO A / C will be blocked Today update your PAN CARD Click Here http://bit.do/sbhnk SBI असा link असलेला text massage आला त्यावर त्यांनी क्लिक केले असता व pan card नंबर टाकला असता त्यांना एक OTP आला . फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये Autofill submit option select असल्यामुळे आलेला OTP Autofill submit झाला , त्यानंतर त्यांच्या खात्यामधुन लागलीच 3,00,000 / – रुपये कपात झाल्याचा मॅसेज आला , त्यावर लागलीच सायबर पोलीस स्टेशन बीड येथुन सर्व नोडल ऑफीस व बँकेचे मॅनेजर यांना मेल करुन व Transaction Details पाठवुन सदर रकम फ्रिझ करणे बाबत कळवीले , त्यावरुन सदर तक्रारदार यांची फसवणुक करुन गेलेली रक्कम Payu payments pvt ltd या ठिकाणी असल्याचे दिसुन आली त्यावरुन सायबर पोलीस स्टेशन येथुन Payu payments pvt ltd यांचेशी संपर्क व सर्व तांत्रीक योग्य कार्यवाही करुन Payu payments pvt ltd यांचे कड्डुन फिर्यादी यांची फसवणुक करुन गेलेली 3,00,000 / – रुपये रक्कम फिर्यादी यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली . सदर कामगीरी ही मा . पोलीस अधीक्षक बीड सो , मा . अप्पर पोलीस अधीक्षक सो , बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो . उपनि जाधव , सायबर पोलीस स्टेशन , बीड यांनी केली आहे .