Uncategorized

आता झेडपीत संचिका केवळ पाच मिनीटात उपलब्ध होणार, संचिकांची नोंद वेबसाईटवर करण्याच्या प्रक्रियेला आला वेग, संचिका जतन करण्याचे काम महिणा अखेरपर्यंत पुर्ण करा – सीईओ अजित पवारांचे आदेश


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या सर्व संचिका एकाच ठिकाणी जतन करण्याचे धोरण अतिशय उपयोगी असून प्रत्येक संचिकाची नोंद परिषदेच्या वेबसाईटवर होणार असल्याने आवश्यक असलेली संचिका केवळ पाच मिनिटात उपलब्ध होणार आहे, मात्र हे काम येत्या महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले आहे

अभिलेख कक्षात ठेवण्यात येणार्‍या संचिका व ऑनलाईन अद्यावत माहिती भरण्यासाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते, जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे संचिका जतन करण्यासाठी जिल्हा परिषद इमारतीमध्ये केंद्रीय अभिलेख कक्ष तयार करण्यात आलेला असून त्यात संचिकेची वर्गवारी करून ठेवल्यास संचिका पाच मिनिटात सापडू शकेल, याकरिता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर अभिलेखेच्या नोंदी करावे लागणार आहेत. या नोंदी महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले. भविष्यातील आपला ताण कमी करणे व तंत्रज्ञानासोबत आपण तयार असावेत याकरिता मनापासून सर्व कर्मचार्‍यांनी ‘अबकड’ अशी वर्गवारी करून कायमस्वरूपी जतन करणारे तसेच तीस वर्षांसाठी व दहा वर्षांसाठी अभिलेखे वर्गीकरण करून केंद्रीय अभिलेख कक्षात कायमस्वरूपी जतन करून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला आळस बाजूला ठेवून नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त वेळ देऊन या महिना अखेरपर्यंत आपले काम पूर्ण करून घ्यावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहे. जिल्हा परिषदेचे सतरा विभाग प्रमुख व सर्व गटविकास अधिकार्‍यांनी आपल्या अधिनस्त सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांच्या मदतीने अभिलेखांचे वर्गीकरण व अभिलेख यांच्या नोंदी संकेतस्थळावर करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व मदत करण्याची आवश्यकता आहे जर सर्व संचिका एकाच ठिकाणी असतील तर कर्मचार्‍यांना संचिका सांभाळण्याची अतिरिक्त जबाबदारी राहणार नाही, त्यामुळे काम अत्यंत सोपे होणार असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत केलेले असून या संकेतस्थळावर सर्व विभागांची कर्मचारी निहाय व संचिका निहाय माहिती भरता येणार आहे संचकेत असलेले एकूण पानांची संख्या संचकेचा विषय संचिका सुरू होण्याचा दिनांक व संचिका बंद होण्याचा दिनांक तसेच संचिका कायमस्वरूपी नष्ट करण्याचा दिनांक एकाच वेळी उपलब्ध होणारा असून हे सर्व अद्यावत माहिती भविष्यात कर्मचार्‍यांसाठी अत्यंत उपयोगाची आहे. तसेच दुसर्‍या टप्प्यात अकरा तालुक्यांचे अभिलेखे अद्यावत करण्याची मोहीम लगेच तयार आहे असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद सर्व विभागाचे कर्मचारी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते, संचिका विषयानुरूप यादी तयार करणे संचिकेतील पानावर क्रमांक टाकणे पत्र व्यवहारांचा क्रमांक टाकल्या नंतर संचितीतील सर्व पानांची संख्या आपोआप येणार आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक कर्मचारी आपापले विषय व संचिका संकेतस्थळावर अद्यावत करणार आहेत, कार्यशाळेसाठी सर्व विभागाचे कर्मचारी संचिकेच्या माहितीसह उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!