Uncategorized

पिंपळनेरमध्ये एसपींच्या पथकाची चक्रीवर छापेमारी, 16 जणांवर गुन्हा दाखल


बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : सोमवारी दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 18:20 वाजता पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळनेर गावाच्या लगत पिंपळनेर-बीड रोडवर हॉटेल यशच्या बाजूला  पत्र्याचे शेडमध्ये (चक्री) सोरट नावाचा जुगार खेळणार्‍या इसमांवर एसपींच्या विशेष पथकाने छापा मारला. यावेळी सात जुगार्‍यांना  जागीच ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून नगदी रक्कम 10,910 व चक्री जुगार खेळण्यासाठीचे साहित्य यामध्ये दोन एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर, सीपीयू बॅटरी असे एकूण 62, 910 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छापेमारीदरम्यान संदीप प्रल्हाद भालशंकर रा. एमआयडीसी पेठ बीड), उत्तरेश्वर नवनाथ भोसले (रा. पिंपळनेर तालुका जिल्हा बीड), सिद्धांत सतीश हिरवे (रा. भीम नगर जुना मोंढा बीड), राम वामन सातपुते (रा. बाबळवाडी तालुका जिल्हा बीड), गोरख प्रकाश खराडे रा.पिंपळनेर तालुका जिल्हा बीड), उत्तरेश्वर मोतीराम लांडे (रा. सांडरवन तालुका जिल्हा बीड) आणि सुनील अशोक जाधव (रा.पिंपळनेर तालुका जिल्हा बीड) या सात जणांना ताब्यात घेवून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 19.00 वाजता पिंपळनेर गावामध्ये पिंपळनेर- घाटसावळी रोडवर पत्र्याच्या शेडमध्ये (चक्री) सोरट नावाचा जुगार खेळणार्‍या इसमांवर छापा मारला असता 9 इसमांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून नगदी रक्कम 27,550/-  तसेच एलईडी टीव्ही कॉम्प्युटर सीपीयू बॅटरी मोबाईल हँडसेट असे एकूण 85,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सुनील मधुकर माने (रा. ताडसोन्ना तालुका जिल्हा बीड), विशाल शिवाजी बाटे (रा. कानोबा नगर पिंपळनेर तालुका जिल्हा बीड), रफिक नवाज पठाण रा. गांधीनगर पेठ बीड 4)शेख इरफान शेख मुसा रा. अजमेर नगर बालेपिर तालुका जिल्हा बीड 5)मुस्तफा नसीरोदिन तांबोळी रा. पिंपळनेर तालुका जिल्हा बीड 6) तहसीन कमरोद्दिन तांबोळी रा. पिंपळनेर तालुका जिल्हा बीड  7)जैनुद्दीन मोहितदिन शेख रा. वैतागवाडी तालुका जिल्हा बीड. 8) गोपीनाथ रामदास फुलमाळी रा. पिंपळनेर तालुका जिल्हा बीड 9) बाळू सर्जेराव ढेकळे राहणार टिपर वाडी तालुका जिल्हा बीड )नमूद 9 आरोपीता विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ )प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनी विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप, पोलीस नाईक विकास काकडे, पोलीस अंमलदार किशोर गोरे, पोलीस अमलदार विनायक कडू, पोलीस अंमलदार बालाजी बास्टेवाड वाड, चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!