Uncategorized

गणरायाच्या स्वागतासाठी बीड सज्ज, गणेशत्सव मोठ्या उत्साहात अन् शांततेत पार पाडण्यासाठी एसपी, एएसपींनी बीडमध्ये घेतली शांतता कमिटीची बैठक


बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : येत्या 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत आहे, या गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण बीड शहर सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हा गणेशत्सव मोठ्या उत्साहात अन् शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी शहरातील जैन भवनमध्ये शांतता कमिटीची बैठक घेतली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीत एसपी आणि एएसपींनी अनेक सुचना दिल्या असून याचे पालन बीडकरांकडून नक्कीच होईल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी उप विभागीय अधिकारी संतोष वाळके, बीड शहर ठाण्याचे ठाणेदार रवि सानप, बीड ग्रामीण ठाण्याचे संतोष साबळे, पेठ बीडचे केदार पालवे पाटील, शिवाजीनगर ठाण्याचे केतन राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिस प्रशासनाने बीड शहरातील विविध प्रमुख गणेश मंडळ, पक्ष, संघटना, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गणेश उत्सवादरम्यान येणार्‍या विविध अडचणी व सूचना या बैठकीत मांडल्या व त्या सोडवल्या गेल्या. अत्यंत गांभीर्याने सर्व सूचनांवर पोलीस अधिक्षकांनी पर्याय व प्रश्न सोडवून घेतले, तसेच या बैठकीमध्ये अनेकांनी सूचना, गणेश उत्सवानिमित्त शांतता,सुव्यवस्था, व सलोखा रहावा यासंदर्भात संबोधन केले. यावेळी महेश धांडे, लक्ष्मण जाधव, भगिरथ बियाणी, शेख शफीक यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!