बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : दि.24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोजे भेंडी टाकळी गावाच्या शिवारातील तलावाच्या जवळ पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळणार्या पत्त्याच्या क्लबवर छापा मारला असता 11 जुगार खेळणार्या इसमांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून नगदी रक्कम 48,420/- रुपये तसेच जुगार खेळताना वापरलेले अकरा मोबाईल हँडसेट आणि तीन मोटरसायकली असे मिळून एकूण 2,04,420/- मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईवेळी ज्ञानोबा भास्कर जाधव (रा. शेलु तालुका गेवराई), सिद्धेश्वर विष्णू माने (रा. भेंड टाकळी ता. गेवराई), मोहन सखाराम उबाळे (रा. भेंड टाकळी), विष्णू चतुर्भुज भोईटे (रा.शेलु ता. गेवराई), भीमराज शेषराव जगधने (रा. लिमगाव ता. माजलगाव), आदिनाथ सूर्यभान कोठेकर (रा. गया नगर बीड), दत्तात्रय रामभाऊ उबाळे (रा.भेंड टाकळी ता. गेवराई), मधुकर बाबासाहेब लोंढे (रा. भेंडाळी ता. गेवराई), मोहन वशिष्ठ लोंढे (रा. भेंड टाकळी ता. गेवराई), शिवाजी विठ्ठल उबाळे (रा. भेंड टाकळी ता. गेवराई) आणि सोमनाथ बळीराम भोसले (रा. रुई ता. गेवराई) असे 11 आरोपीतांविरुद्ध तलवाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनी विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप, पोलीस नाईक विकास काकडे, पोलीस अमलदार किशोर गोरे, पोलीस अमलदार विनायक कडू, पोलीस अमलदार बालाजी बासतेवाड, चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली आहे.
error: Content is protected !!