Uncategorized

जिल्ह्यात एलसीबीची छापेमारी, अवैध दारु विक्री करणारे, जवळ दारू बाळगणारे, कल्याण, सोरट जुगार खेळणारांवर धाडी तर सात पाहिजे आरोपींना ठोकल्या बेड्या


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांच्या आदेशाने त्यांच्या पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. अवैध दारू विक्री करणारे, जवळ दारू बाळगणारे, कल्याण, सोरट जुगार खेळणार्‍यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी सात पाहिजे आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेवून कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्यानुसार 24 ऑगस्ट 2022 व 25 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिश वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 24 ऑगस्ट रोजी गेवराई शहरात शिवाजी चौकाजवळ विनानंबरचे मो.सा. वर एका पिवळया गोणीमध्ये अवैध विदेशी दारु विक्री करण्यासाठी घेवून जात असतांना सदर ठिकाणी स्था.गु.शा. चे पथक पाठवून छापा मारला असता इसम नामे सदाशिव तुकाराम चव्हाण वय 45 वर्षे रा . ठाकरआडगांव ता.गेवराई याचे ताब्यात 32,200 / – रु.चा मुद्येमाल जप्त करुन त्याचेविरुध्द पो.स्टे . गेवराई येथे गुन्हा नोंद केला आहे. तसेच बीड ते अ.नगर जाणारे रोड कडा येथे इसम नामे सचिन भिमराव पवार वय 32 वर्षे रा . कडा याचे राहते घरी स्था.गु.शा. चे पथकाने छापा मारुन विनापरवाना बेकायदेशीररित्या 250 लिटर ताडी दारु किं. 12,500 / – रु.ची त्याचे ताब्यात मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . आष्टी येथे गुन्हा नोंद केला आहे . तसेच बीड ते अ.नगर रोडवर हॉटेल ओ सेठ तळेगांव येथे स्था.गु.शा. चे पथकाने छापा मारला असता इसम नामे सागर अशोक बाळशंकर रा.पंचशिलनगर , बीड याचे ताब्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी, विदेशी दारु किं . 3700 / – चा मुद्येमाल मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . बीड ग्रामीण येथे गुन्हा नोंद केला आहे. बीड ते अ.नगर रोडवर हॉटेल विराज तळेगांव येथे स्था.गु.शा. चे पथकाने छापा मारला असता इसम नामे विपुल नवनाथ मस्के रा . पालवण ता . जि . बीड याचे ताब्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी , विदेशी दारु किं . 8900 / – चा मुद्देमाल मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . बीड ग्रामीण येथे गुन्हा नोंद केला आहे. दुसर्‍या दिवशी 25 ऑगस्ट रोजी बीड शहरात नाटयगृहाजवळ स्था.गु.शा. चे पथकाने इसम नामे शिवाजी नामदेव सानप रा . वडझरी ता . पाटोदा हा विनापरवाना बेकायदेशिररित्या देशी विदेशी दारु विक्री करण्यासाठी घेवून जात असतांना त्याचे ताब्यात एका पांढर्‍या पिशवीत 5,000 / – चा मुद्येमाल मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . शिवाजीनगर येथे गुन्हा नोंद केला आहे. तसेच बीड शहरात तुळजाई चौक येथे स्था . गु.शा. चे पथकाने इसम नामे सागर कल्याण चोरमले रा . तिप्पटवाडी ता . जि . बीड हा लाल रंगाचे स्कुटी क्र . चक – 23 – इऊ – 2075 चे डिक्कीमध्ये विनापरवाना बेकायदेशिररित्या देशी विदेशी दारुची विक्री करण्यासाठी घेवून जात असतांना त्याचे ताब्यात 27,500 / – रुपयांचा मुद्येमाल मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . शिवाजीनगर येथे गुन्हा नोंद केला आहे. तसेच चर्‍हाटाफाटा येथील अश्विनी हॉटेल येथे स्था.गु.शा. चे पथकाने छापा मारला असता इसम नामे संतोष रघुनाथ मिटकर रा . कल्याणनगर , चर्‍हाटाफाटा , बीड हा विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारु व टुबर्ग बिअरची विक्री करीत असतांना त्याचे ताब्यात 5,200 / – रु.चा मुद्येमाल मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . शिवाजीनगर येथे गुन्हा नोंद केला आहे. तसेच देवडी ता . वडवणी येथील आप्पा धाबा येथे स्था.ग.शा.चे पथकाने छापा मारला असता इसम नामे माणिक रंगनाथ जाधव , रा . रांजरी , ता . गेवराई हा अवैध देशी विदेशी दारु विक्री करीत असतांना त्याचे ताब्यात 2,330 / – चा मुद्येमाल जप्त करुन त्याचेविरुध्द पो.स्टे . वडवणी येथे गुन्हा नोंद केला आहे. तसेच कडा ग्रामपंचायत समोर पडदा लावलेल्या पत्र्याचे शेडमध्ये ऑनलाईन चक्री मटका जूगार खेळत व खेळवित आहेत . त्यावरुन सदर ठिकाणी स्था.गु.शा. चे पथक पाठवून छापा मारला असता त्या ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगार खेळत असताना इसम नामे 1 ) उमर शब्बीर शेख 2 ) प्रदीप अनिल मोहिते 3 ) सागर बाळासाहेब मोहिते 4 ) अमिन युनूस शेख सर्व रा . शेवगांव जि.अ.नगर असे मिळुन आले . त्यांचे ताब्यात जुगाराचे साहित्य व नगदी रक्कम असा एकुण 49,320 / – रु.चा मुद्येमाल मिळुन आला. तसेच बीड ते अ.नगर रोडवर मुज्जू कुशन दूकानाचे पाठीमागे मोकळया जागेत स्था . गु.शा. चे पथकाने छापा मारला असता इसम नामे सय्यद अफरोज सय्यद जाफर रा . बालेपीर , बीड हा कल्याण नावाचा मटका जुगार स्वत : चे फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरित्या खेळत व खेळवीत असतांना मिळून आला . तो सदरचा मटका हा राजु लोखंडे रा . बसस्थानक , बीड यास 10 % कमीशनवर देतो असे सांगीतले . त्याचे ताब्यात नगदी व जुगाराचे साहित्य असा एकूण 2,600 / – रु.चा मुद्येमाल मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . शिवाजीनगर येथे गुन्हा नोंद केला आहे . तसेच पाणी पुरवठा ऑफीस समोर धानोरा रोड , बीड़ लगत पान टपरीमध्ये स्था . गु.शा. चे पथकाने छापा मारला असता इसम नामे रफीक बेग चाँद बेग रा . बालेपीर आमराई , बीड हा कल्याण नावाचा मटका जुगार स्वत : चे फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरित्या खेळत व खेळवीत असतांना मिळून आला . त्याचे ताब्यात नगदी व जुगाराचे साहित्य असा एकूण 3,660 / – रु.चा मुद्येमाल मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . शिवाजीनगर येथे गुन्हा नोंद केला आहे . तसेच पाणी पुरवठा ऑफीस समोर धानोरा रोड , बीड लगत पान टपरीमध्ये स्था . गु . शा . चे पथकाने छापा मारला असता इसम नामे असरार मोहंमद दोस्त मोहंमद खान रा . राजीवनगर , बीड हा कल्याण नावाचा मटका जुगार स्वतःचे फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरित्या खेळत व खेळवीत असतांना मिळून आला . तो सदरचा मटका हा अंकुश उर्फ बंडू वसंत कदम रा . कबाडगल्ली , बीड यास 10 % कमीशनवर देतो असे सांगीतले . त्याचे ताब्यात नगदी व जुगाराचे साहित्य असा एकूण 10,960 / – रु.चा मुद्येमाल मिळून आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे . शिवाजीनगर येथे गुन्हा नोंद केला आहे . तसेच नगरनाका ते नाटयगृह रोड , बीड येथे एका पान टपरीचे बाजूला सोरट नावाचा जुगार पैसे लावून खेळत व खेळवीत असतांना सदर ठिकाणी स्था . गु.शा. चे पथकाने छापा मारला असता एका चार्टवर वेगवेगळे चित्रावर पैसे लावून सोरट नावाचा जुगार खेळत असतांना इसम नामे 1 ) आकाश सदाशिव वडमारे 2 ) सुखदेव दादाराव डोंगरे 3 ) महिंद्र राजेंद्र बोराडे 4 ) सचिन छगन रोकडे 5 ) सुरज पिराजी वीर 6 ) गणेश केशव ठोकळ सर्व रा . इंदीरानगर , पंचशीलनगर , बीड हे मिळून आले . त्यांचे ताब्यातून सोरट जुगाराचे साहित्य व नगदी असा एकूण 23,560 / – रु.चा मुद्येमाल जप्त करुन त्यांच्याविरुध्द पो.स्टे . शिवाजीनगर येथे गुन्हा नोंद केला आहे . दिनांक 24/08/2022 व दिनांक 25/08/2022 रोजी अवैध दारु विक्री करणारे व जवळ बाळगणारे ( 08 ) , ऑनलाईन चक्री मटका ( 01 ) , कल्याण मटका ( 03 ) , सोरट जुगार ( 01 ) , अशा एकूण ( 13 ) केसेस करुन ( 07 ) पाहिजे आरोपी कमी केले आहेत . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा , बीड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!