Uncategorized

मराठा समाजाचा झुंजार सेनानी हरपला – राजेंद्र मस्के, शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांना भाजपा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

( बीड प्रतिनिधी )
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांचे काल भीषण अपघाता मध्ये दु:खद निधन झाले. मेटे साहेब यांच्या अकाली जाण्याने समाजात शोककळा पसरली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण केले. स्वत:च्या कार्यकर्तुत्वातून राजकीय व सामाजिक क्षितिजावर कीर्ती निर्माण केली. तरुण वयापासूनच समाजसेवा आणि नेतृत्व करण्याचा गुण त्यांचा व्यक्तीमत्वात होता. त्यांच्यामुळे राजकारण आणि समाजसेवा करण्याची संधी मला मिळाली. माझ्या राजकीय आयुष्यात मार्गदर्शक ठरले. आयुष्यभर मराठा समाज उन्नतीसाठी संघर्ष करणाऱ्या झुंजार सेनानीला समाज मुकला आहे. माझा परिवार व भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
मेटे साहेबांना मराठा समाजाच्या अडचणी, समस्या, दु:ख आणि वेदनांची जाणीव त्यांना होती. समाजाविषयी असणाऱ्या अंतरिक तळमळीमुळे आरक्षणाचा लढा त्यांनी उभारला. गेली कित्येक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता. मेटे साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला. महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन समाजाशी संपर्क ठेऊन शिवसंग्राम संघटनेचे माध्यमातून अनुयायी व तरुण कार्यकर्त्यांच जाळ निर्माण केल. जिद्द आणि चिकाटीने समाजाला आरक्षणाची संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. वैधानिक, न्यायिक आणि लोकशाहीच्या विविध मार्गाने आरक्षणाची चळवळ जिवंत ठेवली. समाजाचे काही प्रश्न मार्गी लावले. आज त्यांच्या अकाली जाण्याने फार मोठे दु:ख नियतीने समाजाच्या पदरात टाकले. समाजासाठी झगडणारं दमदार नेतृत्व मेटे साहेब याचं नाव लोकांच्या मनात चिरंतर राहील. विनम्र अभिवादन व ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ही प्रार्थना.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!