Uncategorized

विनायकराव मेटे यांच्या निधनामुळे मराठा समाज आणि राज्याचे मोठे नुकसान झाले – अमरसिंह पंडित

बीड (प्रतिनिधी) – विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनामुळे मराठा समाज आणि महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायकरावांनी स्वतःच्या कर्तुत्वावर राज्यभर नावलौकिक मिळविला. मराठा आरक्षण आणि समाज्याच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष केला. आम्ही विधान परिषदेत सोबत काम केले, शिवाजीराव पंडित कुटुंबीयांनी माझ्या राजकीय जडघडणीत मोठी मदत केल्याचा उल्लेख ते नेहमी करतं, त्यांचे अकाली निधन वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी दिली आहे.

एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायकरावांचा परिचय महाराष्ट्राला होता. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींचा प्रश्न असेल अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांवर ते अभ्यासूपणाने काम करत. शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले, बीड जिल्ह्यात सुद्धा त्यांनी अनेक सामजिक उपक्रम राबविले, शिवसंग्राम संघटना राज्यभर मजबुत करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. अनेक वरिष्ठ अधिकारी व नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. शिवसंग्राम संघटना, मेटे कुटुंबीय आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये पंडित परीवार सहभागी आहे, अशा भावना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केल्या. भावपूर्ण श्रद्धांजली.

०००

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!