Uncategorized

विनायक मेटे यांच्या निधनाने चळवळीत काम करणाऱ्या नेत्याला महाराष्ट्र मुकला, पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

परळी ।दिनांक १४।
शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांच्या निधनाने चळवळीत काम करणाऱ्या नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत मेटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

पंकजाताई मुंडे यांनी मेटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आजचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. पंकजाताई म्हणाल्या,
“दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने विनायकराव मेटे सारख्या सतत चळवळीत काम करणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला, त्यांना २२ – २३ वर्ष पाहते आहे, कुटुंबात कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी विना राजकारणात स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्याच्या जीवावर उभा असणारा मराठा चळवळीतील नेता हरपला, त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…”
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!