Uncategorized

पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवारी १३ ऑगस्टला परळी शहरात भव्य तिरंगा रॅली, विविध शाळेतील विद्यार्थी, सर्व संस्थांचे पदाधिकारी होणार सहभागी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

परळी वैजनाथ दि. 10
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात येत्या शनिवारी (ता. 13) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. यात शालेय विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, वकील आदी सहभागी होणार असून नागरिकांनीही मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन केले आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

शनिवारी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन रॅलीला सुरवात होणार असून पंकजाताई मुंडे हया स्वतः रॅलीत उपस्थित राहणार आहेत. बस स्थानक – रेल्वे स्थानक – एकमिनार चौक – स्टेशन रोड – भवानी नगर – आर्य समाज मंदिर – राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे मोंढ्यात रॅलीचा समारोप होणार आहे. रॅलीमध्ये विविध शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, डाॅक्टर्स, वकील, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!