पाटोदा : लोकाशा न्यूज
पाटोदा, तालुक्यातील हनुमानगड सावरगाव येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांना जामखेड तालुक्यातील मोहरी येथे एका मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरोधात जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना खर्डा पोलीसांकडून दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडील सदर गुन्ह्यात चोरी गेलेले २० तोळे सोने हस्तगत करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असुन
बलात्कार प्रकरणांमध्ये बुवासाहेब खाडे महाराज आठ दिवसांपासून फरार आहेत
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा तपास करून बाजीराव गिते व अरूण गिते यांना ३ आँगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी तपास करून आरोपीकडून २० तोळे सोने हस्तगत केले आहे. सोमवारी पोलीस कोठडी संपत असल्याने पोलीसांनी सदर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता आणखी तपासासाठी व इतर तीन आरोपींना अटक करायची असल्याने आरोपींना कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलीसांनी केली असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्यावर जामखेड तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असल्याने बुवासाहेब खाडे आठ दिवसांपासून फरार आहेत.
हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्यावर जामखेड तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असल्याने बुवासाहेब खाडे आठ दिवसांपासून फरार आहेत