Uncategorized

सिंदफना नदीपात्रात कुमावतांच्या पथकाची छापेमारी, साठा करून ठेवलेली दिडशे ब्रास वाळू, एक जेसीबी, दोन ट्रक्टरसह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केला


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाकडून दररोजच कारवया सुरू आहेत. त्यांच्या याच कारवयांमध्ये अवैध धंदे करणार्‍यांना मोठी जरब बसली आहे. बुधवारी सायंकाळी कुमावतांच्या याच पथकाने शिरूर परिसरात सिंदफना नदीपात्रात छापेमारी केली. यावेळी अवैध वाळू उपसा करताना एक जेसीबी, दोन ट्रक्टर मिळून आली, या तिन्ही वाहनांबरोबरच अवैधपणे स्टॉक करून ठेवलेली दिडशे ब्रास वाळू असा एकूण 28 लाख रूपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळाली की, मौजे कमळेश्वर धानोरा (ता. शिरूर) येथे काही इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या सिंदफना नदी पात्रातील वाळू जेसीबीच्या साह्याने उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरून चोरटी विक्री करण्यासाठी आणून साठा करीत आहेत, ही माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस अंमदार व शिरूर तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सदर ठिकाणी पाठवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले, त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कमळेश्वर धानोरा येथील सिंदफना नंदी पात्रात बुधवारी सायंकाळी जाऊन छापा मारला, यावेळी नदी पात्रात वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये वाळू भरणारी एक जीसीबी, वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन मंडळ अधिकार्‍यांच्या मदतीने जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतले. तसेच जीसीबी व ट्रॅक्टरने नदीपात्रातून वाळू आणून केलेला स्टॉक अंदाजे वाळूचा दीडशे ब्रासचा स्टॉक मंडळ अधिकार्‍यांच्या मदतीने जप्त करून जेसीबी व दोन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालय शिरूर येथे लावण्यात आलेले आहे जप्त केलेले जेसीबी दोन ट्रॅक्टर किमती 2700000 रुपये व अंदाजे 150 ब्रास वाळू किंमत 90000 रूपये असा एकुण 2790000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर आणि वाळू साठ्यावर शिरूरचे तालुका दंडाधिकारी कायदेशीर कारवाई करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, पोलीस नाईक राजू वंजारे, संजय टूले, दीपक जावळे, मंडळ अधिकारी खंडागळे,तलाठी शिंदे यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!