बीड : बीड जिल्ह्यातील ६९ जिल्हापरिषद गटांपैकी १८ गट ओबीसींना राखीव ठेवण्यात आले आहेत. यात रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे.