बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : झेडपीच्या नव्या बिल्डींगमधून सध्या पाच विभागांचा कारभार सुरू आहे तर या बिल्डींगमध्ये आणखी तीन विभाग येणार आहेत. यामध्ये शिक्षण, डीआरडी आणि पाणी पुरवठा या विभागांचा समावेश असून लवकरात लवकर हे विभाग शिफ्ट करावेत, असे आदेश एसीईओ वासूदेव सोळंके यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.
राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी बीड शहरात जिल्हा परिषदेची टोलेजंग ईमारत उभी केली, या ईमारतीमुळे बीड शहराच्या वैभवात मोठी भर पडलेली आहे. सध्या याच विभागातून जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके हे पाच विभागांचे काम करत आहेत. या ईमारतीमध्ये आणखी तीन विभाग सहजपणे बसू शकतात, हेच गणीत डोळ्यासमोर ठेवून लवकरच या ईमारतीमध्ये शिक्षण, डीआरडी आणि पाणी पुरवठा हे तीन विभाग आणण्यात येणार आहेत. हे तिन्ही विभाग लवकरात लवकर या ईमारतीमध्ये स्थलांतरीत करावीत, असे आदेश एसीईओ वासूदेव सोळंके यांनी दिले आहेत. या तिन्ही विभागांसाठी लागणार्या छोट्या मोठ्या बाबींची तात्काळ पुर्तता करावी, असे आदेशही सोळंके यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसातच या नव्या ईमारतीमधून शिक्षण, डीआरडी आणि पाणी पुरवठ्याचा काम सुरू झाल्याचे सर्वांना पहायला मिळणार आहे.