Uncategorized

आदित्य सारडा यांना कॉम्पुटर इंजिनीरिंग शाखेत पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त

बीड: येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.,बीड चे माजी अध्यक्ष तथा आदित्य शिक्षण संस्था बीड चे संचालक श्री. आदित्य सुभाषचंद्रजी सारडा यांनी भारती विद्यापीठ,पुणे येथून कॉम्पुटर इंजिनीरिंग या शाखेत पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
श्री.आदित्य सारडा यांनी शालेय शिक्षण राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय,बीड येथे पूर्ण केले, त्यानंतर अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय बीड मध्ये कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग या शाखेतून पूर्ण केले तसेच सॉफ्टवेअर इंजिनीरिंग या शाखेतून पदव्युत्तर पदवी चे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर भारती विद्यापीठ,पुणे येथे पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा पास होऊन पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. या पीएच.डी.अभ्यासक्रमादरम्यान श्री.आदित्य सारडा यांनी यु.जि.सी. प्रमाणित स्कोपस इंडेक्स मध्ये ७ नॅशनल व इंटरनॅशनल पब्लिकेशन्स व जर्नल्स सादर केले.
तसेच, IEEE आयोजित २ इंरनॅशनल कॉन्फरेन्स मध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर ८४ संशोधन पेपर वर सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी दिनांक ३१ मे २०२२ रोजी डेटा ऑडिटिंग मध्ये नाविन्यपूर्ण असलेल्या “अनॅलिसीसी ऑफ परफॉर्मन्स सॉफ्टवेअर डेव्हलमेंट लाईफ सायकल मॉडेल्स इम्पीमेंटेशन वीथ योटो डेटा ऑडीटींग ” हा शोध प्रबंध पुणे येथील भारती विद्यापीठात दाखल केला. या शोध प्रबंधासाठी आदित्य सारडा यांना शोध प्रबंध मार्गदर्शक डॉ. शशांक जोशी यांनी मार्गदर्शन केले. या शोध प्रबंधात आडाप्टीव डिसक्रीट इंटेग्रेशन टेस्टींग फॉर योटाडेटा ऑडीटींग हे मॉडेल तयार करण्यात आले असुन त्याचे नाव आदित्य मॉडेल आहे. या शोध प्रबंधास बाह्य परिक्षक म्हणून चेन्नई येथील सत्यभामा इन्स्टीट्युट ऑफ सायन्स अँड टेन्कॉलाजीचे डॉ. इमलडा रॉसलीन , पुणे येथील कॉलेज ऑफ इंजीनीयरींगचे डॉ. संदीप वांजळे यांच्या आधिपत्याखाली प्रात्यक्षिक परिक्षा घेण्यात आली व डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली.
आदित्य सारडा यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एम.एम साळुंखे, कुलसचिव जी.जयकुमार , पीएचडी विभागाचे डॉ.सूर्यवंशी , वडील सुभाषचंद्र सारडा यांच्यासह कुटूंबीय, डॉ. सुहास मोहीते, डॉ. राजेंद्र मोहीते, डॉ.पंकज कडू ,डॉ. अरूण मुंडे ,डॉ.संतोष कांबळे,डॉ.बळीराम शिंदे, डॉ. अनिल शेंडगे, संतोष लहाने, राहुल खडके, सागर गायकवाड, यांनी अभिनंदन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!