कडा / वार्ताहर
येथील पोलिस चौकींतर्गत असलेल्या एका गावातून महिन्यापुर्वी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कडा पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून त्या सैराट आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कडा पोलिस चौकींतर्गत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीला केरुळ( ता. आष्टी) येथील अक्षय बाळू भोज नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणाने फुस लावून पळवून नेले होते. याबाबात मागील महिन्यात दि. ८ जून रोजी पोलिसांत सदर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात कडा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावरून तपास करुन सोलापूर जिल्ह्यातील संगम गावात लपलेल्या आरोपी अक्षय भोज व महेश भोज या सैराट जोडीच्या मुसक्या आवळून गजाआड केले तर अल्पवयीन मुलीला बीडच्या सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
—————%%————
चौकट
सैराट एक महिन्यात गजाआड
विभागीय पोलिस अधिकारी डाॅ. अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सलिम चाऊस, सहायक पोलिस निरिक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक फौजदार राजेंद्र पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोहेकाॅ बाबासाहेब राख, बंडू दुधाळ, मंगेश मिसाळ या कर्मचा-यांनी एका महिन्यात तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून सैराट जोडप्यांना गजाआड केले. सदर आरोपीविरुध्द आष्टी पोलिसांत अपहरण, बाललैगिक अत्याचार, अॅट्रासिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कडा पोलिसांकडून देण्यात आली आहे.
————–%%———–