बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग सोळंके यांनी ‘मी येतोय आपल्या भेटीला संवाद जनतेशी, संवाद कार्यकर्त्यांशी’ हा उपक्रम राबत माजलगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये भेटी देत 10 दिवसंात 71 गावांत पोहचले. त्यांनी स्वतःच्या जिल्हा परिषद फंडातून दिलेल्या अनेक कामांचे लोकार्पण करुन ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमामध्ये जयसिंग सोळंके यांच्या मी येतोय आपल्या भेटील संवाद जनतेशी, संवाद कार्यकर्त्याशी या उपक्रमाला गावागावातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग सोळंके यांनी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, तांडे, गावांना भेटी देत जनतेशी संवाद करुन जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांनी स्वतः मंजूर केलेल्या माजलगाव तालुक्यातील 27 कामांचे लोकार्पण करुन फक्त 10 दिवसात 71 गावांना भेटी देवून प्रत्येक गावातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून जनतेचा व कार्यकर्त्यांचा समस्या जाणून घेत काही समस्या जागच्या जागेवरच मिटवून समस्या दूर केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जयसिंग सोळंके यांच्या मी येतोय आपल्या भेटीला संवाद जनतेशी संवाद कार्यकर्त्यांशी या उपक्रमात त्यांनी 10 दिवसात 71 गावांना भेटी देत तालुक्यातील 27 कामांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संभाजी शेजुळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जयदत्त नरवडे, राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष लखन थावरे, शंतनू सोळंके, प्रशांत शेटे, अजय बुरंगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 71 गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी सरपंच, सरपंच यांनी जयसिंग सोळंके यांच्या मी येतोय आपल्या भेटीला संवाद जनतेशी संवाद कार्यकर्त्यांशी या उपक्रमाचे कौतूक केले.
या कामांचे झाले लोकार्पण
प्ररामा 16 पासून वांगी बुद्रूक रस्त्यावरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन 25 लक्ष, तुकाराम सोळा पासून शिंदेवाडी रस्ता 20 लक्ष, शिंदेवाडी ते बेलुरा पांदन रस्ता भूमिपूजन, लमानवाडी रस्त्यावरील नळकांडी पूल 5 लक्ष, नित्रुड ते चंद्रभान तांडा रस्त्यावरील पूल 3 लक्ष, नित्रुड ते मोहकुळ तांडा रस्त्यावरील पूल 3 लक्ष, टालेवाडी ते चाहर तांडा रस्ता सुधारणा व पूल बांधकाम 20 लक्ष, शिंदेवाडी ते रामा 209 जोड रस्ता सुधारणा 15 लक्ष,पात्रुड माध्यमिक शाळा दुरुस्ती 30 लक्ष, पशुवैद्यकीय दबाखाना नवीन इमारत पाथरूड 25 लक्ष कामाची पाहणी, लहामेबाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 3 लक्ष रुपये, लवुळ क्रमांक गाव अंतर्गत दोन सिमेंट रस्ते 6 लक्ष, निपाणी टाकळी ते पद्याबती तांडा रस्ता सुधारणा 20 लक्ष, उमरी आनंदगाव रस्ता 20 लक्ष, खदगव्हाण फाटा ते कोथरुळ रस्ता सुधारणा 10 लक्ष, खदगबान ते पोहनेर रस्ता 20 लक्ष, साळेगाव हनुमान मंदिर हायमस्ट 3 लक्ष, साळेगाव गावांतर्गत सिमेंट रस्ता 3 लक्ष, सालेगाव भक्त निवास 10 लक्ष, गंगामसला पशुवैद्यकीय दवाखाना 24.99 लक्ष, गंगामसला जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली बांधकाम 8 लक्ष, रामा 222 ते सर्वर पिंपळगाव रस्ता सुधारणा 20 लक्ष, गुंजथडी ते इजीमा 59 रस्ता सुधारणा 15 लक्ष, गुंजथडी थडी जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली बांधकाम 8 लक्ष या विकास कामांचे लोकार्पण भैय्यांनी केले आहे.