Uncategorized

पंकजाताईंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा ! फडणवीस म्हणाले, ताई कोणत्याही पदाकरिता एलिजिबलच आहेत, आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मक पाठिंबा


मुंबई, 27 मे : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक (MLA Election 2022) होणार आहे. या निवडणुकीत कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजाताई मुंडे (Pankajatai Munde) यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे पंकजाताईंचं नाव याआधीदेखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आलं होतं. आता पुन्हा एखादा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना संधी मिळणार असल्याचे समोर येत आहे, या निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळावी का? याबाबत पंकजाताईंनी आज मोठं विधान केलं. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील पंकजाताई विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पात्र असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 10 जागांसाठीच्या आगामी निवडणुकीत पंकजाताईंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी पंकजाताई नारायण गडावर आल्या होत्या, यावेळी त्यांना माध्यमांनी अनेक प्रश्न विचारले, यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीवरही त्यांचे मत जाणून घेण्यात आले,
“मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझी अशी कुणाशी चर्चा नाही. प्रत्येकवेळी निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते. आता हा पायंडा पडलेला आहे. पण माझी अशी कुणाशीही चर्चा झालेली नाही. अनेक नावं पुढे येत आहेत. माझ्या एकटीचं नाव पुढे येत नाहीय. अनेक जागा आहेत. पक्ष जो निर्णय घेईल ते निर्णय झाल्यावरच कळेल”, अशी भूमिका पंकजाताईंनी मांडली. यावर माध्यमानी देवेंद्र फडणविसांशी संवाद साधला, “पंकजाताईंबद्दल नाराजी वगैरे नाही. ताई आमच्या सिनियर नेत्या आहेत. ज्यावेळी एखादी निवडणूक येते त्यावेळेस त्यांचं नाव चर्चेत येणं हे साहजिक आहे. त्यामुळे त्यात काही वावगं नाही. कारण त्या कोणत्याही पदाकरता एलिजिबलच आहेत. त्या संदर्भातील निर्णय त्या आणि हायकमांडला घ्ययाचा आहे. आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मक पाठिंबा आहे. त्या आणि आमचे हायकमांड दोन्ही मिळून या संदर्भात निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया फडणवीसानी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!