परळी वैजनाथ दि २२ ( लोकाशा न्युज ) :- शिवसेनेचे केज विभागाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी दामोदर दत्तोपंत कुलकर्णी रा हनुमान नगर अंबाजोगाई यांचेवर एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात खंडानी, विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील माणिक नगर भागात राहत असलेली एक ३० वर्षीय महिला दिनांक २१ मे २०२२ रोजी १२.४५ वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालय ते माणीक नगर येथे पायी चालुन जात असतांना कोर्टाचे समोर यातील आरोपी शिवाजी कुलकर्णी यांनी फिर्यादीस आवाज देवुन थांबवुन फिर्यादीची फिर्यादीचे वडीलाची व भावाची शासकीय नोकरी घालवुन देण्याची धमकी देवुन फिर्यादीचे दंडाला धकाबुक्की केली व तिचे मनाला लज्जा निर्माण झाली तसेच तिला बघ मांगटी खुप माजली होतीस तुझी व तुझ्या भावाची नौकरी घालवतो अशा धमक्या देत चुपचाप २५ लाख रुपये दे असे म्हणुन खंडणीची मागणी केली. धांदरलेल्या महिलेने सर्व शहर पोलीस ठाणे गाठीत झाला सर्व प्रकार परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना सांगितला. उमाशंकर कस्तुरे यांनी क्षणाचाही विलंब न करता सरळ पीडित महिलेच्या तक्रारीवरून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी दामोदर दत्तोपंत कुलकर्णी रा हनुमान नगर अंबाजोगाई यांचेविरुध्द गु र नंबर ११४/२०२२ कलम ३८४, ३५४, ३२३, ५०४, ५०६ भादवी दि २१ मे २०२२ नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधीकारी सुनील जायभाय हे करीत आहेत.
दरम्यान झाल्या प्रकाराने परळी शहर आणि परिसरात खळबळ माजली असून एका निरपराध महिलेस गोरगरीब आणि सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या शिवसेनेच्या एका जबाबदार पदाधिकार्याने धमक्या देऊन खंडणी मागत, विनयभंग करीत जातीवाचक शिवीगाळ केली. त्या पदाधिकाऱ्यांवर नेमकी कशी व कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.