Uncategorized

देवडीत कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

बीड दि.१९(प्रतिनिधी):
वडवणी तालुक्यातील देवडी येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आसाराम दत्तू सांगळे वय ४४ असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की
वडवणी तालुक्यातील देवडी
आसाराम दत्तू सांगळे (वय ४४ ) या शेतकरी मागील काही दिवसांपासून कर्जबाजारी झाला होता. दरम्यान चार पाच दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न झाले होते मुलीच्या लग्नाला झालेला खर्च आणि पुर्वीचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते राहत होते. मागील तीन चार दिवसापूर्वी पासून मी कर्ज कसे फेडू आणि संसाराचा गाडा कसा चालवू, माझे कसे होणार असे सारखे म्हणत होते. या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून मंगळवार दिनांक 17 रोजी सकाळी आठ वाजता त्यांनी शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध घेतले ते माहीत होताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचार सुरू असतानाच आज गुरुवार दिनांक 19 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई-वडील, चार भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.


लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!