बीड दि.१८ (प्रतिनिधी):- शहरातील बिंदुसरा नदीवरील,सुरु असलेल्या पूल व बंधारा कामास गती मिळणे व खांडे पारगाव येथील टुकूर रखडलेले बंधारा प्रकल्पा ऐवजी ४ निमनस्तरीय बंधारे तयार करण्यात यावे या मागणीसाठी आ.संदीप क्षीरसागर यांचे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने शर्थीचे प्रयत्न सुरु होते.या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.बुधवार (दि.१८) रोजी या कामाच्या अनुषंगाने केलेल्या आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील ना.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत दोन्ही कामांना ना.जयंत पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर मान्यता दिली असून पुढील कार्यवाही तात्काळ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देशित केले आहे.यातून अखेर आ.संदीप क्षीरसागर यांच्या अविरत प्रयत्नांना यश आले आहे.
दरम्यान शहरातील बिंदुसरा नदीवरील मंजूर असलेला पूल, बंधाऱ्याचे काम प्रस्तावित जागेवर न करता औरंगाबाद-सोलापूर हायवेवर नवीन पुलाच्या उत्तरेस ५०० मीटर अंतरावर करण्यात यावा.जेणेकरून सादर प्रकल्पामुळे ०. ३५ दलघमी पाणीसाठा वाढू शकतो असे नियोजन आहे.त्यामुळे हे बंधाऱ्याचे काम मंजूर जागेत न करता प्रस्तावित जागेत करावे.यासोबतच तालुक्यातील खांडेपारगाव परिसरातील टुकूर प्रकल्प गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित आहे.या प्रलंबित बंधारा कामाऐवजी ४ निमनस्तरीय बंधारे करण्यात यावे. अशी प्रकारच्या मागण्यांचा पाठपुरावा आ.संदीप क्षीरसागर यांनी जलसंपदा मंत्री ना.यांच्याकडे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून केला होता.यावर आज बुधवार (दि.१८) रोजी ना.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती.या बैठकीत बिंदुसरा नदीवरील बांधाराकाम पुलाची बोर मॅपिंग झालेली आहे.ना.जयंत पाटील यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव आपल्या स्तरावरून पुढील कायदेशीर मान्यतेसाठी व अन्य परवानग्यांसाठी तातडीने सामुग्री भूवैज्ञानिक मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था,नाशिक यांच्याकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.तसेच टुकूर प्रकल्पाच्या मागणीसंदर्भात तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.या बैठकीस जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील,आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह आ.प्रकाश सोळुंके,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.सय्यद सलीम,जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव,लाभ क्षेत्र विकास प्रकल्प समन्वयक,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक,मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चौकट
कामांच्या उदघाटनाला स्वतः येणार-ना.जयंत पाटील
दरम्यान या कामांच्या अनुषंगाने सकारात्मक बैठक झाली असून पुढील कार्यवाहीसाठी ना.जयंत पाटील यांनी तातडीने निर्देश दिले असून या कामांच्या उदघाटनास मी स्वतः येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.