पाटोदा, दि. 8 (लोकाशा न्यूज) : पाटोदा शहरातील पारगाव रस्ता परिसरातील एका अत्याधुनिक जलतरण तलावात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. 7 मे रोजी दुपारी घडली.
अजिंक्य मोहन कोठुळे वय वर्षे 12 रा. जवळा ला ता. पाटोदा जि. बीड असे या मयत मुलाचे नाव असून अजिंक्य हा आपले आजोबा (आईचे वडील) तात्यासाहेब महादेव वीर रा. क्रांती नगर पाटोदा यांचाकडे आपल्या आईसह मागील काही दिवसांपासून राहत होता. पाटोदा शहरात पारगाव रस्त्या नजीक डॉ. आर.बी. डीडूळ यांचे हॉस्पिटल असून त्याच परिसरात त्यांनी जलतरण तलाव बांधला आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे बच्चे कंपनीसह अनेक जन दुपारच्या वेळी याठिकाणी पोहण्याचा अनाद घेण्यासाठी येतात . शनिवारी दुपारी एक च्या दरम्यान अजिंक्य हा आपल्या काही मित्रासांह याठिकाणी आला होता जलतरण तलावात हे सर्व मित्र पोहत असताना अजिंक्य हा अचानक पुढील बाजूस साधारणतः आठ ते दहा फुट खोली असलेल्या भागाकडे गेला व प्रत्यक्ष दर्शीच्या म्हणण्यानुसार त्यावेळी अचानक त्याने परिधान केलेली ट्यूब निसटली व तो खोल पाण्यात बुडाला. सर्व जन पोहण्यात व्यस्त असल्याने तो बुडत असल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही तसेच त्याठिकाणी देखरेखी साठी असणारा कर्मचारी देखील त्याच वेळी काही कामा निमित्त बाहेच्या दालनात गेला होता त्यामुळे अवघ्या काही क्षणातच अजिंक्य चा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला ही बातमी कुटुंबियांना व नागरिकांना समजताच डॉ. डीडूळ यांच्या दवाख्ण्याच्या परिसरात मोठा जमाव जमा झाला यावेळी संतप्त जमावाने या जलतरण तलावासाठी योग्य प्रशिक्षक नसताना तसेच सुरक्षितते साठीची कोणतीही उपाय योजना नसताना मुलांना पोहण्यासाठी कसे सोडले जाते असा सवाल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर पोलीस निरीक्षक डी.बी. कोळेकर, पीएसआय आर.व्ही . पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याबाबत तात्यासाहेब महादेव वीर यांनी दिलेल्या फियादिवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास आर.व्ही. पतंगे हे करत आहेत.