बीड, दि. 18: महिलांच्या न्याय हक्कांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बीडच्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ.संगीता चव्हाण यांची नुकतीच राज्य महिला आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे, आज त्यांचा खासदार प्रीतमताई मुंडे यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या हिताचे कार्य त्यांच्या हातून अविरत घडत राहील व या नव्या जवाबदारीला त्या न्याय देतील अशा सदिच्छा यावेळी खा मुंडेंनी व्यक्त केल्या.