Uncategorized

मोदींच्या जलजीवन मिशनच्या संकल्पनेला जिल्ह्यात खा.प्रीतमताईंकडून मिळणार धार, जिल्ह्यात 744 कोटींची कामे होणार, प्रत्येक गावातील कामांना गती देण्यासाठी ताईंचे यंत्रणेवर बारीक लक्ष, 18 एप्रिलच्या बैठकीत कामाचे नियोजन आणखी तगडे होणार


बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : दिवसभरात एका व्यक्तीला पिण्याचे पाणी किती प्रमाणात लागते याचे आवरेज काढून ते त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलजिवन मिशन हाती घेतलेले आहे. मोदींच्या या मिशनच्या संकल्पनेला जिल्ह्याच्या दबंग खा. प्रीतमताई मुंडे यांच्याकडे धार मिळणार आहे. येत्या काळात जिल्ह्यातील 1367 गावातील प्रत्येक घरांमध्ये नळाव्दारे पाणी पुरवठा होताना पहायला मिळणार आहे. या कामांवर तब्बल 744 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊशे गावांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे, यापैकी 459 गावांतील कामांना तांत्रिक मान्यता, 205 गावातील कामांचे टेंडर झालले आहे. 79 गावातील कामांच्या वर्कऑर्डर निघाल्या असून आठवड्यात आणखी 58 गावातील कामांचे टेंडर निघणार आहे. या सर्व कामांवर खा. प्रीतमताईंचे बारीक लक्ष असून येत्या 18 एप्रिलला त्या यासंदर्भातच सीईओ अजित पवार यांच्यासह झेडपी प्रशासनासोबत एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत जनजिवन मिशनच्या कामाचे नियोजन आणखी तगडे होणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाला एक कणखर असे नेतृत्व मिळालेले आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यालाही अगदी मोदींप्रमाणेच प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून एक कणखर खासदार मिळालेला आहे. वास्तविक पाहता मोदींनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात जलजिवन मिशनची मोठी योजना हाती घेतली आहे. या योजनेतून प्रत्येक घराघरात नळाव्दारे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मोदींच्या या योजनेमुळे बीड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न खर्‍या अर्थाने मार्गी लागणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याची असणारी हीच योजना अत्यंत प्रभावी आणि चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी खा. प्रीतमताई मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. इतर योजनांप्रमाणेच हीही योजना लोकउपयोगी करण्याचा त्यांचा मानस आहे, त्याअनुषंगानेच या संपूर्ण योजनेवर खा. मुंडेंचे पहिल्यापासूनच बारीक लक्ष आहे. विशेष म्हणजे येत्या 18 एप्रिल रोजी सकाळी आकरा वाजता बीड झेडपीच्या सभागृहात या विषयावर अधिकार्‍यांसोबत त्या आढावा बैठक घेणार आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी या योजनेचे काम चोखपणे सुरू केलेले आहे, आता झेडपीत होणार्‍या खा. मुंडेंच्या या बैठकीमुळे जलजिवनच्या कामांना जिल्ह्यात आणखी गती मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, नगर-बीड-परळी रेल्वेबरोबरच आता खा. मुंडेंमुळे जिल्ह्यात जलजिवन मिशनमधूनही मोठे लोकहिताचे काम उभे राहिलेले पहायला मिळणार आहे.

जिल्ह्यातील रस्त्याचेही प्रश्‍नही सुटणार
खा. प्रीतमताईंनी बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे मोठे जाळे निर्माण केलेले आहे. बीड जिल्ह्याला पुढे घेवून जाण्यासाठी त्यांच्या डोक्यात अनेक कल्पना आहेत. त्यांच्या याच कल्पना आज बीड जिल्ह्याला विकासात पुढे घेवून जात आहेत. 14 ते 18 एप्रिल असा त्यांचा बीड जिल्ह्यात झंझावात असून 18 एप्रिलला दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बीड जिल्ह्यातून जाणार्‍या सुरत-नगर-चेन्नई या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात त्या आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीतून जिल्ह्यातील रस्त्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!