परळी ।दिनांक १२।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सैन्याने परळीत वीज मंडळाच्या विरोधात आज अनोखे आंदोलन केले. भर उन्हाळ्यात सुरू असलेल्या भारनियमनाविरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विज उपकरणाची शहरातून अंत्ययात्रा काढून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.
पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने शहरातील महावितरण कार्यालयावर आज विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रतिकात्मक बंद फॅन ची तिरडी बाजार समिती मोंढा येथून व्यापार पेठ,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून महावितरण कार्यालयापर्यंत काढण्यात आली.यावेळी महावितरण च्या गलथान कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पामुळे होणारे राखेचे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम परळी परिसरातील नागरिक भोगत आले आहेत असे असतानाही याठिकाणी होणारे भारनियमन दुर्दैवी आहे.त्याच बरोवर आता अंतिम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत,सततचे होणारे भारनियमन विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे असून याविरुद्ध आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात, त्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, विविध महापुरुषांच्या जयंतीच्या होणारे भारनियमन तात्काळ रद्द करून सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
या आंदोलत नगरसेवक पवन मुंडे,मोहन जोशी,अरुण पाठक, अनिस अग्रवाल,नितीन समशेट्टी,सचिन गित्ते,अश्विन मोगरकर,योगेश पांडकर,प्रशांत कराड, किशोर केंद्रे,राहुल केंद्रे,,गोविंद चौरे,सुशील हरंगुळे,दिलीप नेहरकर,नरेश पिंपळे,अनिस शेख,श्रीनिवास राऊत,श्रीपाद शिंदे,शाम गित्ते,निलेश जाधव,अनिश कुरेशी,गोविंद मुंडे,धनराज कुरील,अच्युत जोगदंड,उमेश निळे,राहुल घोबाळे,गोविंद मोहेकर,अंगद माळी, सुनील कांबळे,विजय बुंदेले, संदीप चौंडे,गजूजी राजनाळे,गोपाळ केंद्रे,सोमनाथ गित्ते आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
••••