Uncategorized

लोडशेडींग की विजेचा लपंडाव, महावितरणच्या विरोधात भाजपा आंदोलन करणार -राजेंद्र मस्के.

बीड प्रतिनिधी

गल्लीपासून ते मुंबई पर्यंत महावितरण कंपनीचा कारभार ढासळला. भ्रष्टाचार आणि राजकीय हेवेदाव्यात गुंतलेल्या राज्य सरकारने ऊर्जा खात्याला वाऱ्यावर सोडले.गेली तीन दिवसांपासून
अचानक विजेचा लपंडाव चालू असून किमान आठ ते बारा तास विज खंडित होते. या लपंडावाला महावितरण कंपनीने चक्क लोडशेडींगचे नाव दिले. लोड शेडींग ला कोणतेही वेळापत्रक नाही. याची सूचना जनतेला नाही.लादलेल्या लोडशेडिंग मुळे सर्व जनता हैराण झाली. उष्णतेची तीव्र लाट आणि शहरात डासांचे थैमान असताना तासंन तास वीज गायब होत असल्याने लहान मुलं महिला वृद्ध नागरिक यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. तर
भुईमूग, मका, उन्हाळी सोयाबीन, ऊस,भाजीपाला आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ सुरू आहे.
आघाडीतील घटक पक्षांनी ऊर्जा खात्याला कोंडीत पकडले असून अंतर्गत कुरघोडी मुळे जनतेचा बळी जात आहे. असा आरोप भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला.
सक्तीने शेतकऱ्यांची वसुली करणाऱ्या महावितरणने पुन्हा एकदा लोडशेडिंगच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक फटका दिला.
कोळशाचा तुटवडा झाल्याने वीज टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते.मग उर्जा खातं झोपलं होत का.याचा जबाब कोण देणार. गेल्या अडीच वर्षात ऊर्जा विभागाने कधीही राज्यातील सामान्य जनता व शेतकरी बांधवांचा विचार केलेला नाही. कोरोना महामारीच्या संकटात ही जनतेला वेठीस धरले.
आज ऊर्जा विभागाचे भोंगळ धोरण आणि महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा जनतेच्या मुळावर उठला. जनतेला आर्थिक फटका व मानसिक ताण भोगण्याची वाईट वेळ मविआ सरकारने आणली.
मागील पाच वर्षात भाजपा सरकारने जनतेला विजेसाठी वेठीस धरले नाही. भीषण टंचाई निर्माण होऊ दिली नाही.
महावितरण कंपनीने तातडीने वीज टंचाईतून मार्ग काढावा. विजेचा लपंडावाचा खेळ बंद करावा. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा भारतीय जनतापार्टी महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!