Uncategorized

पंकजाताईंमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजळले- राजेंद्र मस्के, बोरखेडेवस्ती- बोरखेड ते गोलंग्री रस्ता कामाचे भूमिपूजन संपन्न


बीड प्रतिनिधी,
काल जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील बोरखेडेवस्ती- बोरखेड ते गोलंग्री रस्ता कामाचे भूमिपूजन ऑंनलाईन पद्धतीने व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हापरिषद सदस्य अशोक लोढा, रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, सलीम जहांगीर, स्वप्नील गलधर, शांतीनाथ डोरले, सचिन उबाळे, अनिल चांदणे,सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, जालिंदर धांडे, गणेश तोडेकर, अभिमान अवचारे, सरपंच विलास गावडे सर, यांच्यासह प्रतिष्टीत ग्रामस्थ हजर होते.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था होती. ग्रामस्थांनी मागणी करूनही रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले नाही. तत्कालीन पालकमंत्री लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खाते आल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना भरमसाठ निधी मिळाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यात सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. अनेक दुर्लक्षित रस्त्यांचे भाग्य उजळले. ताईंनी मंजूर केलेल्या निधीवर अजूनही कामे चालू आहेत. कोठ्यावाधीचा निधी देऊन, अडगळीतील गावांना डांबरी रस्ते देऊनही पंकजाताईनी कधीही विकासकामात राजकारण केले नाही. अथवा श्रेय घेतले नाही. असे मत यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले आहे.पुढे बोलताना मस्के म्हणाले कि, सध्याचे माविआ आघाडीचे आमदार महोदय आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करत आहेत. रमेश पोकळे,जि.प.सदस्य अशोक लोढा यांचे प्रयत्न व सरपंच गावडे सर यांच्या पाठपुराव्यामुळे बोरखेड रस्ता मंजूर झाला.व त्याचे आज डांबरीकरण होत आहे. सातत्याने पाठपुरावा करून अशोक लोढा यांनी चौसाळा गटातील अनेक विकास कामांना गती दिली. लोकांच्या भावना लक्षात घेऊन अनेक कामे पुर्ण केली आहेत.
मविआ आघाडीचे सरकार येऊन सत्तेचा अर्धाकाळ लोटला. या कालावधीत आमदार महोदयांनी कोणत्या रस्त्यासाठी किती निधी आणला हे सांगता येणार नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातुन राज्यात मिशन जलजीवन योजनेतून जिल्ह्यातील बहुतांश खेड्यात स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी काडीचे प्रयत्न नसताना या नळ योजनांचे श्रेय लाटण्यासाठी आमदार महोदय शुभारंभाचे नारळ फोडत गावोगावी फिरत आहेत. याची आमदार महोदयांना लाज वाटली पाहिजे. फुकट चे श्रेय लाटण्याऐवजी आपल्या सरकार पुढे लोटांगण घेऊन विकास कामांची गंगा आणण्यासाठी धडपड करावी असा टोला राजेंद्र मस्के यांनी लावला. व खऱ्या अर्थाने विकासाचे राजकारण किमान शेवटच्या टप्यात तरी सुरु करावे असे आवाहन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!