बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दै. लोकाशाचे संपादक विजयराज बंब, एमडी रोशन बंब हे दै. लोकाशाचे उपसंपादक, तालुका प्रतिनिधी आणि ग्रामीण प्रतिनिधींना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करतात, त्यानुसार या वर्षीही दै. लोकाशाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे सहा मानकरी त्यांनी जाहिर केले आहेत. या पुरस्कारामध्ये दै. लोकाशाचे उपसंपादक अभिजित नखाते, मुकेश झनझणे, तालुका प्रतिनिधी विनोद पौळ, सुनिल कावळे, ग्रामिण प्रतिनिधी विवेक कचरे आणि अजहर इनामदार यांचा समावेश आहे, त्यानुसार आज दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी दै. लोकाशाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या हस्ते हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत. या पुरस्काराबद्दल त्या सहाही जणांवर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वंचित, उपेक्षितांचा आवाज म्हणून आज दै. लोकाशा काम करीत आहे, दै. लोकाशामधून छापून आलेल्या बातमीमुळे अनेकांना खर्या अर्थाने न्याय मिळत आहे. त्यामुळेच आज प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचे काम दै. लोकाशा करीत आहे, वास्तविक पाहता याच दैनिकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रतिनिधी आपआपली भुमिका अत्यंत प्रमाणिक आणि चाणक्य पध्दतीने पार पाडत आहेत, दै. लोकाशात अशाच चाणक्य पध्दतीने काम करणार्या पत्रकारांचा संपादक विजयराज बंब, एमडी रोशन बंब हे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करत आहेत. या वर्षभरात दै. लोकाशाचे उपसंपादक अभिजित नखाते, मुकेश झनझणे, गेवराई तालुका प्रतिनिधी विनोद पौळ, धारूर तालुका प्रतिनिधी सुनिल कावळे, राजेगावचे प्रतिनिधी विवेक कचरे, उमापुरचे अजहर इनामदार यांची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे, त्यांची हिच कामगिरी लक्षात घेवून या सर्वांना संपादक विजयराज बंब, एमडी रोशन बंब यांनी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहिर केला आहे. आज दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी दै. लोकाशाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या हस्ते हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत. हा सोहळा अत्यंत दिमाखदार ठरणार असून आपल्या कार्यालयाकडून होत असलेला सन्मान या सहा जणांसाठी मोठी उर्जा देणारा ठरणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल या सहा जणांचे निवासी संपादक उत्तम हजारे, वृत्त संपादक भागवत तावरे, उपसंपादक नितीन चव्हाण, व्यवस्थापक अतूल भालशंकर यांच्यासह संपूर्ण जिल्हाभरातून कौतूक केले जात आहेे.