Uncategorized

परळीत नायब तहसीलदारावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेसरमाची झाडे फेकली,कामात पक्षपातीपणा केल्याचा आरोप शहर पोलिसात गुन्हा दाखल


परळी वैजनाथ दि २९ ( लोकाशा न्युज ) :-
महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करीत आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात घुसून त्यांच्या अंगावर बेशरमाची झाडे फेकली. या प्रकरणाने नविन वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर परळी काँग्रेस शहराध्यक्ष बहादुर यांच्यासह जवळपास २५ ते ३० कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, आज सकाळच्या वेळी आमच्या कामात पक्षपातीपना केला असा गंभीर आरोप करत आणि घोषणाबाजी करत परळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर यांच्यासह २० ते २५ काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयात घुसले आणि नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात घुसून प्रचंड घोषणाबाजी करीत रुपनर यांच्या अंगावर आश्रमाची झाडे फेकली ह्या प्रकाराने तहसील कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराबाबत परळीचे शहर पोलीस ठाणे गाठून तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून कालीदास कोंडीराम पवार वय ५५ वर्ष यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार यांच्या फिर्यादीनुसार दि. २९/०३/२०२२ रोजी १२.०० वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय परळी वै. येथे ना. तहसीलदार रुपनर यांचे दालनात असता तेथे ते शासकीय काम करीत असतांना आरोपींनी गैरकायदयाची मंडळी जमवून नायब तहसीलदार यांचे शासकीय कामात अडथळा करून नायब तहसीलदार यांच्या अंगावर व दालनात बेशरमाचे फुल, फाटे, कचरा टाकला. आमचे कामे करीत नाही तुम्ही बेशरम अधीकारी आहेत. तसेच नायब तहसीलदार, महसुल अधीकारी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी बहादुरभाई (काँग्रेस शहर अध्यक्ष परळी), गणपत अप्पा कोरे, शेख जमील शेख लाल, शेख असलम पाशा, सय्यद मकसुब गुत्तेदार, सय्यद युनुस स.मंजुर, शिवाजी देशमुख, बद्रोद्दीन बाबुमियाँ शेख, प्रकाश लक्ष्मणराव देशमुख, सुभाष देशमुख, शेख अमजद लत्तीफ, रंजीत रामराजे देशमुख सर्व रा. परळी यांच्या सह ईतर १५ ते १८ अनोळखी लोकांविरुद्ध गुरनं ५४/२०२३ कलम ३५३,१४३, ५०६, भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!