Uncategorized

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर,शिबीरात होणार रूग्णांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया

पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम, गरजूंनी लाभ घ्यावा - खा. डॉ. प्रितमताई मुंडे

परळी । दिनांक २७ ।
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.
येत्या ६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. या शिबिरात स्त्री रोग, बालरोग, र्‍हदय रोग, त्वचा रोग, नेत्र रोग, कान – नाक – घसा, अस्थी रोग, जनरल सर्जरी, दमा व छातीचे विकार, दंत रोग, मुत्रविकार, अस्थी रोग आदींची तपासणी करून औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिरात परळी – वैजनाथ, अंबाजोगाई सह बीड जिल्हयातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रूग्णांची तपासणी, उपचार करणार आहेत.

शस्त्रक्रियाही मोफत

शिबीरामध्ये तपासणी झाल्यानंतर रूग्णांचा आजार व गरजेनुसार डाॅक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचा परळी वैजनाथ मतदार संघातील गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!