Uncategorized

एसआयटीचा दणका,
चिंचपूर देवस्थान आणि वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यात दोन अधिकाऱ्यांना ठोकल्या बेड्या

बीड, राज्यात गाजलेल्या चिंचपूर देवस्थान आणि वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरण माध्यमांनी सर्वात अगोदर दाखवले होते आणि हे प्रकरण लावूनही धरले आहे. त्यानंतर या प्रकरनात एसआयटी पथक नेमण्यात आले आहे. या एसआयटी पथकाकडून आणखी एका बड्या अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. प्रदीप पांडुळे, नायब तहसील भूम व शिवशंकर गंगाधर सिंघनवाड मंडळाधिकारी आष्टी, असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्रदीप पांडुळे हे अगोदर आष्टी येथे होते तर आता बदली होऊन ते भूम येथे कार्यरत आहेत. वक्फ बोर्डाची जमिन मदतमाश जाहिर करुन, भलत्यांच्याच नावे केल्याचा गुन्हा आष्टी पोलीसात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये या दोघांनाही मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या जवळपास ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे यामध्ये मोठमोठे राजकीय नेते आणि महसूल विभागातील बडे अधिकारी सुद्धा सहभागी असल्यचे पुढे येत आहे. तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये मराठवाड्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहेब यांच्या ७१ एक्कर ८९ गुंठे जमीन घोटाळ्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळकेला अटक केल्यावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवस्थान आणि वक्फ जमिनिच्या घोटाळ्यातील प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला असल्याचे सांगितले जात आहे. पण एकट्या आष्टीतच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये अनेक देवस्थान आणि वक्फ जमिनिवर भूमाफीयांनी गिळंकृत केली आहेत. तर याप्रकरणी महाराष्ट्रात आतापर्यंत १३ तर मराठवाड्यात ७ गुन्हे दाखल झाले आहेत.

या घोटाळ्यामध्ये फक्त महसूल अधिकारीच नव्हे तर राजकीय दिगग्ज नेत्यांची सुद्धा नावे समोर येत आहेत. देवस्थान आणि वफ्फ बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागांचा घोटाळा केल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील केला होता. तर या प्रकरणाची अगोदरच चौकशी झाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!