Uncategorized

स्वाराती’च्या बाह्य रुग्ण विभागाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची आ. नमिता मुंदडा यांनी केली पाहणी

अंबाजोगाई – येथील स्वाराती रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या नवीन इमारतीच्या प्रगतीपथावर असलेल्या बांधकामाला सोमवारी (दि.१५) अचानक भेट दिली. यापूर्वी सुचविल्यानुसार करण्यात आलेल्या बदलांची पाहणी करून त्यांनी अधिष्ठाता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बांधकामातील अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासाठी प्रयत्नपूर्वक नवीन इमारत मंजूर करून आणली होती. सध्या या प्रशस्त इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. काही महिन्यापूर्वी आ. नमिता मुंदडा यांनी या इमारतीच्या कामाची पाहणी केली होती. आ. नमिता मुंदडा या स्वतः वास्तुविशारद (आर्किटेक्ट) असल्याने बांधकाम क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे. मतदार संघातील सर्व नवीन इमारत बांधकामाची त्या आवर्जून पाहणी करतात आणि आवश्यकता असेल तिथे दुरुस्ती अथवा बदल सुचवतात. त्यानुसार त्यांनी या नवीन इमारतीच्या कामातही रुग्णांच्या सोयीसाठी काही बदल सुचवले होते. त्यांच्या सूचनेनुसार हे बदल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (दि.१५) सकाळी त्यांनी पुन्हा इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. आ. मुंदडा यांनी बारकाईने कामाची पाहणी करून सर्वांशी चर्चा केली आणि कामाबद्दल समाधान व्यक्त केले व उर्वरित कामाबद्दल सूचना केल्या. तसेच, वारंवार येऊन पाहणी करणार असून कुठल्याही कामात अनियमितता होता कामा नये अशी सक्त ताकीद दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!