Uncategorized

पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास
मनाई ! मोर्चे,आंदोलन जमणार नाही !!


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, या दृष्टीने जिल्हाधिकार्‍यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात शास्त्र बाळगणे,आंदोलन, मोर्चे काढणे,भडकावू भाषण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
राज्यातील काही भागात दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बीड जिल्ह्यात यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. 10 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3)नुसार प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.या काळात कोणीही व्यक्ती शस्त्र, काठी, तलवार,बंदूक जवळ बाळगणार नाहीत.कोणतेही शस्त्र,दाहक पदार्थ जवळ बाळगणार नाहीत .दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे करणार नाहीत.आंदोलन,मोर्चे करता येणार नाहीत .यासह विविध आदेश दिले आहेत. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष बनकर यांच्या स्वाक्षरी ने हे आदेश देण्यात आले आहेत.हे आदेश मोडणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!