धारूर, दि. 10 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात केंद्रीय स्वच्छता टीम दाखल झालेली आहे. या टीमकडून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जावून त्या ठिकाणच्या स्वच्छतेची पाहणी करून त्याची माहिती अॅपव्दारे केंद्र सरकारला दिली जात आहे. त्यानुसार गुरूवारी सकाळी तालुक्यातील आवरगाव येथे स्वच्छता टिमचे जिल्हा प्रमुख श्री. जगदाळे यांनी भेट देवून गावात शौचालयाच्या केलेल्या कामाची माहिती अॅपवर लोड केली.
धाररूर तालुक्यातील आवरगाव हे जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. या गावाची सर्वस्तरातून दखल घेतली जात आहे. त्यानुसारच गुरूवारी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 अंतर्गत केंद्रीय स्वच्छता टीमचे जिल्हा प्रमुख श्री. जगदाळे यांनी गुरूवारी आवरगाव येथे वैयक्तिक शौच्छालय, सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन व गावातील स्वच्छता विषयक कामाची मोबाईल अॅपवर ऑनलाइन पहाणी केली, यावेळी सरपंच अमोल जगताप, दै. लोकाशाचे उपसंपादक अजित नखाते, विस्तार अधिकारी श्री. गिरी साहेब, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, अंगणवाडी सेविका निता नखाते, कल्याण नखाते, महादेव जगताप, कमलकिशोर जगताप यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.