Uncategorized

आधी परळी शहरातील रस्ते नीट करा नंतर केंद्र सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घ्या – भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले

परळी ।दिनांक २१।
परळी शहरातील रस्त्याची दैना झाली आहे, अगोदर ते रस्ते नीट करा आणि मगच राष्ट्रीय महामार्गाचं आणि केंद्र सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घ्या असा पलटवार भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे व शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केला आहे.

केंद्रात सरकार भाजपचे आहे, जिल्हयाच्या खासदार भाजपच्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा विषय हा त्यांच्या अखत्यारीतला आहे. आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे जाळे जिल्हयात विणले, त्यासाठी कोटयावधी रूपयाचा निधी आणला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदारांची शिफारस व त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे रस्ते दिले असे असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या कामाचे श्रेय पालकमंत्र्यांना श्रेय देणे हे निव्वळ हास्यास्पद आहे. ज्यांना परळी शहरातील रस्ते नीट करता येत नाहीत, त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे श्रेय घेण्याचा नसता खटाटोप करू नये. शहरातील रस्ते, भुयार गटार योजना याचे तीन तेरा कसे वाजले आहेत आणि स्वतःच्या तुंबडया कशा भरल्या आहेत, हे जनतेला कळून चुकले आहे. दहा वर्षांपासून नगरपरिषद तुमच्या ताब्यात आहे, त्याचा साधा कारभार तुम्हाला नीट करता आला नाही, मग राष्ट्रीय महामार्गाचे फुकटचे श्रेय कसले घेता? असा पलटवार भाजपने केला आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!