Uncategorized

नगरपंचायत निवडणुक कामगिरीला सलाम,चंद्रकांत दादा कडून बीड भाजपाचे कौतुक

बीड प्रतिनिधी
राज्यातील नगरपंचायत निवडणुका मध्ये भारतीय जनता पार्टीने अव्वल क्रमांकाचे स्थान पटकावले.
स्वबळावर निवडणूक लढवून 24 नगरपंचायती वर एक हाती सत्ता मिळवली. तर राज्यात सर्वात जास्त सदस्य संख्या असणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ची नोंद झाली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असून भाजपाला पराभूत करण्यासाठी तिन्ही पक्षांनी कंबर कसली होती. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चुरशीने लढा देत या निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायती पैकी 3 नगरपंचायती वर भाजपाने आपले वर्चस्व कायम ठेवले. वडवणी मधील निवडणूक निकाल पाहता तिथेही भाजपाचाच विजय झालेला आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. जिल्ह्यातील 85 सदस्यांपैकी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सदस्य संख्या भारतीय जनता पार्टीची आहे. जिल्ह्यात सत्ताधारी पक्ष शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची पुर्णतः दाणादाण उडाली.
बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीतील भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीरपणे कौतुक करून कार्यकर्त्यांच्या कामगिरीला सलाम केला आहे. दूरध्वनीद्वारे दादांनी जिल्हाध्यक्षांची संवाद साधून कौतुक केले. अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली . घवघवीत यशाशाचे मानकरी आ. सुरेश आण्णा धस यांचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आष्टी येथे सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आ. सुरेश अण्णा धस, राजाभाऊ मुंडे, यांनी सर्व ताकदीनिशी कठोर परिश्रम घेऊन लढत दिली. विरोधकांनी साम-दाम-दंड भेदाचे तंत्र वापरले.बेछूट आरोप करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला.परंतु सुजान मतदार बांधवांनी दिशाभूल वा कोणत्याही आमिषाला बळी न पडता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिले आहे.
सर्व मतदार बांधवांचे भाजपाने आभार व्यक्त केले.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे तत्कालीन पालकमंत्री लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी सत्तेचा पुरेपूर वापर करून जिल्ह्याच्या समृद्ध विकासासाठी भरघोस निधी ओढून आणला. अमुलाग्र बदल करणारे निर्णय घेतले.
यामुळे जनमानसात भारतीय जनता पार्टीची प्रतिमा प्रभावी राहिली. नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामे करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचेच गोड फळ आज नगरपंचायत मध्ये मिळालेले यश आहे.
जिल्ह्याच्या लोकप्रिय
खा.डॉ. प्रीतमताई मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे,आ.लक्ष्मण आण्णा पवार, आ.डॉ.नमिताताई मुंदडा, माजीआ.आर. टी. देशमुख, रमेशराव आडसकर,
मोहनराव जगताप, नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी या नेत्यांनी वेळोवेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून बळ दिले. मतदार बांधवांशी संपर्क साधून नगरपंचायतीच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
नगरपंचायत रणधुमाळी मध्ये
जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तात्या तांदळे यांनी अचूक नियोजन व नेते कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून एकदिलाने नगरपंचायत निवडणूकीचा रणसंग्राम भाजपाने यशस्वीपणे गाजवला.आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकदिलाने निवडणूका लढवून जिल्ह्यात भाजपाची ताकद निर्माण करू असा विश्वास भाजपा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!