नेतृत्व चांगले असेल तर त्या गावाचा, त्या भागाचा, त्या तालुक्याचा, त्या मतदार संघाचा, त्या जिल्ह्याचा विकास गतीने होत असतो, असे धाडसी नेतृत्व बीड जिल्ह्याला स्व.सुंदरराव सोळंके यांच्या माध्यमातून मिळाले, त्यांनी सुरू केलेले काम आज आ. प्रकाश सोळंके, धैर्यशिल काका सोळंके आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके हे पुढे घेवून जात आहेत. वास्तविक पाहता जयसिंह भैय्या एका फायटरप्रमाणेच बीड जिल्ह्यासह माजलगाव मतदार संघातील जनतेचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांच्या माध्यमातून एक धाडसी आणि आक्रमक युवा नेतृत्व माजलगाव मतदार संघाला लाभले आहे. ते वेगवेगळ्या विकास कामातून जिल्ह्यात स्वत:चे कर्तृत्व गाजवत आहेत. कर्तृत्वान असणार्या याच युवा नेत्याचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त त्यांना लक्ष-लक्ष शुभेच्छा !
माजलगावचे सोळंके कुटूंबिय म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे आणि सुसंस्कृत कुटूंबिय. दिवंगत लोकनेते सुंदरराव सोळंकेंनी घालून दिलेल्या आदर्शांवर चालताना सोळंके कुटूंबियांनी कायमच माजलगाव विधानसभा मतदार संघात विकासाचे राजकारण केलेले आहे आणि आजही ते करतच आहेत. सामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाताना, या मतदार संघाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास करण्याचे काम सोळंके कुटूंबाने केले आहे. या कुटूंबाची तिसरी पिढी जयसिंह सोळंकेंच्या रूपाने जनसेवेत आहे. बीड येथे माध्यमिक शिक्षण तर पुण्यात उच्चशिक्षण घेतलेले जयसिंह सोळंके हे सुरूवातीपासूनच युवकांचे संघटन करणारे आहेत. माजलगाव मतदार संघात त्यांनी सन 2011 पासून काम करण्यास सुरूवात केली. केवळ कुटूंबाचा वारसा म्हणून नव्हे तर, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जयसिंह भैय्या समाजकारणातून राजकारणात सक्रीय झाले. धारूर तालुक्यातील मोहखेड पंचायत समिती गणातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ते विजयी झाले. यानंतर धारूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली आणि जिल्ह्यातील सर्वात तरूण उपसभापती म्हणून नेत्रदीपक काम त्यांनी केले. कमी वयात असलेली प्रश्नांची जाण, प्रत्येक कार्यकर्त्यांकडे वैयक्तिक लक्ष, सामान्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार, प्रशासकिय समज या गुणांवर अल्पावधितच त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. सन 2017 मध्ये जयसिंह सोळंके तेलगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्या पराभवासाठी विरोधकांनी अक्षरक्ष: जंग जंग पछाडले. ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली. मोठमोठ्या नेत्यांच्या सभा विरोधकांनी घेतल्या, परंतू सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या जयसिंह भैय्यांना इथल्या मतदारांनी भरभरून आशिर्वाद देत जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवले अन् विरोधक तोंडघशी पडले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात येताच जयसिंह भैय्यांनी जिल्ह्यातील अनेक महत्वांच्या प्रश्नांवर सत्तेमधील भाजपला नेहमीच कोंडीत पकडले. मागच्या अडीच वर्षांपुर्वी बीड जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत बदल झाल्यानंतर झेडपी राष्ट्रवादीच्या ताब्यात आली, त्यानुसार जयसिंह भैय्यांकडे जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम विभागाची जबाबदारी आली. मागच्या अडीच वर्षांपासून ते या पदावर सक्षमपणे काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला गती मिळत आहे. त्यांच्या या कामातून एक धाडसी आणि विकासाला चालणा देणार्या युवा नेत्याचा उदय होत आहे.
शेतकर्यांसाठी तारणहार
दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे जिल्ह्यात, माजलगाव मतदार संघात अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. माजलगाव विधानसभा मतदार संघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना नेहमीच आधार दिला. विधवा झालेल्या शेतकर्यांच्या पत्नीला आर्थिक मदत केली. काही महिलांना पीठाची गिरणी घेवून देत स्वयंरोजगारचा मार्ग दाखवला. शिलाई मशिनचे वाटप करून त्यांना आत्मनिर्भर केले. वडवणी, माजलगाव, धारूर तालुक्यात शेतकर्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली. शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. आणि भैय्या म्हणून खर्या अर्थाने भावाचे कर्तव्य निभावले.
युवकांच्या गळ्यातील ताईत
माजलगाव विधानसभा मतदार संघ आणि युवक आघाडीच्या माध्यमातून केलेल्या संघटनामुळे भैय्या जिल्ह्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. राजकारण करताना युवकांनी व्यसनांपासून दूर रहावे, उद्योगधंदे उभारावेत, विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा, सामान्यांची सेवा करावी हे सांगतानाच हे सर्व कृतीतून ते दाखवून देत असतात. अभ्यासू, विनयशील, शांत, कुशाग्र बुध्दीमत्ता, परखड वक्ता, गावखेड्यातील कार्यकर्त्यांना बळ देणारा युवा नेता यामुळे त्यांची युवकांमध्ये क्रेझ आहे. सर्वात कमी वयाचे सभापती म्हणून ते सध्या जिल्हा परिषदेच्या कार्यकारिणीवर काम करत आहेत. बांधकाम व अर्थसारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी पेलताना माजलगाव विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा आणण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे.
युवक आघाडीच्या अध्यक्षपदाच्या
माध्यमातून जिल्ह्यावर मजबूत पकड
जयसिंह भैय्यांचे प्रत्येक काम बोलणारे आणि प्रत्येकाला न्याय देणारे आहे. त्यामुळे जयसिंह भैय्यांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी युवक आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. मिळालेल्या या संधीचे सोने करत जयसिंह भैय्यांनी संपूर्ण जिल्हाभरात पक्षाच्या मागे युवकांची मोठी फळी उभी केलेली आहे. त्याचा उपयोग पक्षाला प्रत्येक निवडणूकांमध्ये होत आहे. यातूनच त्यांची बीड जिल्ह्यावर मजबूत पकड असल्याचेही पहायला मिळत आहे.
दुष्काळ, पुरस्थिती अन् लॉकडाऊनमध्ये केलेली
मदत जिल्हा विसरणार नाही
सामाजातील वंचातांविषयीची तळमळ, अडल्या नडलेल्यांना मदतीचा हात देताना जयसिंह सोळंके यांच्यातील संवेदनशीलपणा नेहमीच अनुभवायला मिळतो. मग कोल्हापुरच्या पुरग्रस्तांसाठी पाठवलेली मदत असो किंवा कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये शेकडो कुटूंबियांना किराणा किट वाटप इतर उपक्रम राबवून केलेली मदत यात ते नेहमीच पुढे असतात. दुष्काळातही पाण्याचे टँकर दुष्काळग्रस्त भागात पाठवून त्यांनी दुष्काळग्रस्तांची तहान भागवली.
सामाजिक अन् विकास कामातून
पक्षनेतृत्वाचे जिंकले मन
जयसिंह भैय्यांनी नेहमीच आपल्या सामाजिक आणि विकास कामातून पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेतलेले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, यांच्यासह इतर नेत्यांनी जयसिंह सोळंके यांच्या कामाने प्रभावीत होत त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप टाकली. विशेष म्हणजे याच कामाची दखल घेवून त्यांच्याकडे बीड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांबरोबरच झेडपीची आर्थिक वाहिणी त्यांच्या हाती दिलेली आहे.
जेष्ठ आणि दिव्यांगांसाठी भैय्या एक मोठा आधारच
माजलगाव, वडवणी आणि धारूर यापैकी कोणताही तालुका असो, गाव कोणतेही असो, जयसिंह सोळंके जातील तिथे जसा युवकांचा गोतावळला जमा होतो तसे ज्येष्ठही भैय्यांना आशिर्वाद देण्यासाठी येतात. भैय्याही अनेकदा वेगवेगळ्या गावात ज्येष्ठांच्या घरी जावून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधतात. यातून ज्येष्ठांच्या आरोग्य विषयक समस्या लक्षात घेवून त्यांनी महाआरोग्य शिबीर माजलगाव आणि वडवणीत घेतले. अनेक रूग्णांची मोफत तपासणी, शस्त्रक्रिया, औषधोपचार केले इथे जे शक्य झाले नाही त्यांच्यावर पुणे, मुंबईत शस्त्रक्रिया केल्या. दिव्यांगासाठी शिबीर घेवून प्रमाणपत्राचे वितरणही केले.